न्यूड जिमसूटमध्ये मलायकापाठोपाठ ही अभिनेत्री, कोण दिसते सगळ्यात भारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 19:26 IST
दोन्ही अभिनेत्री न्यूड जिमसूटमध्ये स्पॉट झाल्या आहेत.
न्यूड जिमसूटमध्ये मलायकापाठोपाठ ही अभिनेत्री, कोण दिसते सगळ्यात भारी!
ठळक मुद्दे कतरिना कैफने आपले फोटोशूट सोशल मीडियावर न्यूड जिमसूट घालून शेअर केले आहे.पुन्हा एकदा तिच्या ड्रेसिंगमुळेच ती सोशल मीडियावर ट्रोल झाली होती.
बॉलिवूडमधील बऱ्याच हस्ती त्यांच्या पेहरावावरून ओळखल्या जातात. अभिनेत्री तर ड्रेसिंगबाबत पूर्ण काळजी घेतात की जेणेकरून आपण जे काही परिधान करतो ते सर्वात हटके आणि युनिक असेल. मग तो जिमसूट असो किंवा रेड कार्पेट ड्रेस. पण तरीही बर्याच वेळा अभिनेत्री एकाच ड्रेसमध्ये स्पॉट होतात. अशीच काहीसं यावेळी चिकणी चमेली फेम अभिनेत्री कतरिना कैफ आणि छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरासोबत घडली. दोन्ही अभिनेत्री न्यूड जिमसूटमध्ये स्पॉट झाल्या आहेत.
कतरिना कैफने आपले फोटोशूट सोशल मीडियावर न्यूड जिमसूट घालून शेअर केले आहे. नुकतीच मलायका अरोरा जिमच्या बाहेर न्यूड जिमसूटवर स्पॉट झाली. कतरिना आणि मलायकाचे हॉट फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहते दोघांचेही कोलाज बनवत आहेत आणि शेअर करत आहेत आणि कोण अधिक चांगले अशी तुलना करत आहेत. उन्हात मलायकाचा हा जिम आऊटफिट दिसतच नाही. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही तिची खिल्ली उडवत होते. कपडे न घालताच जिमला पोहचली की काय? अशा कमेंटस तिला युजर्सने पोस्ट केल्या होत्या. पुन्हा एकदा तिच्या ड्रेसिंगमुळेच ती सोशल मीडियावर ट्रोल झाली होती.
कतरिना कैफ ‘सूर्यवंशी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. हा चित्रपट २४ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.