Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ब्रह्मास्त्र 2, क्रिश 4 की शक्तिमान', कार्तिक आर्यन साकारणार 'सुपरहिरो'? नेमकं काय होतंय लोडिगं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 11:08 IST

कार्तिक आर्यनने त्याचा एक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'चंदू चॅम्पियन' आणि 'भूल भुलैया 3' या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' सिनेमाचे पोस्ट प्रॉडक्शन सुरू असून 'भूल भुलैया 3'चे कास्टिंगचं काम सुरू आहे. पण यातच कार्तिकने स्वतःचा असा एक अनोखा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याने चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे.  कार्तिकाला सुपरहिरो अवतारात पाहून सगळेच दंग झाले आहेत. 

कार्तिक आर्यनने त्याचा एक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यामध्ये तो सुपरहिरोच्या अवतारात दिसत आहे.  त्यांच्याभोवती सोनेरी प्रकाश लपेटलेला आहे. कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'लोडिंग'.  कार्तिक आर्यनच्या या पोस्टवर चाहते खूप कमेंट करत आहेत. कार्तिक आर्यन सुपरहिरोच्या भुमिकेत पाहायला मिळणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.  'शक्तीमान', 'क्रिश ४' किंवा 'ब्रह्मास्त्र 2' यापैकी कोणत्या सिनेमात कार्तिक दिसणार असा प्रश्न एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये केला आहे.

कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले तर, 'सत्यप्रेम की कथा'मध्ये कार्तिक आणि कियारा आडवाणी झळकले होते. आता लवकरच त्याचा 'चंदू चॅम्पियन' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं लेखन कबीर खाननं केलं आहे. तर निर्माता साजिद नाडियादवाला आहे. कार्तिक आर्यन भारताच्या पहिल्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मुरलीकांत पेटकरची भूमिका साकारणार आहे. कार्तिकशिवाय भुवन अरोरा, पलक लालवानी आणि अमेरिकन अभिनेता ॲडोनिस कपसालिस हे देखील सिनेमात दिसणार आहेत. 

टॅग्स :कार्तिक आर्यनसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा