Join us

अभिनयाला रामराम करत कार्तिक आर्यन होणार फूड ब्लॉगर? पोस्ट होतीये व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 18:57 IST

Karthik aaryan: कार्तिकने एक पोस्ट शेअर करत फूड ब्लॉगर व्हायची इच्छा व्यक्त केली आहे.

अनेक अभिनेत्रींचा क्रश असलेला अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. आजवरच्या कारकिर्दीत कार्तिकने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे उत्तम आणि दर्जेदार अभिनय कौशल्यामुळे सध्या त्याच्याकडे अनेक मोठमोठ्या प्रोजेक्ट्सच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे अभिनय कारकिर्द उत्तमरित्या सुरु असतानाच कार्तिकने चक्क फूड ब्लॉगर व्हायची इच्छा व्यक्त केली आहे.

कार्तिकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन विविध फूड ट्राय करताना दिसत आहे. सोबतच त्याने कॅप्शन देत फूड ब्लॉगर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सध्या कार्तिक बंगळुरुमध्ये असून त्याने येथील काही फेमस रेस्टॉरंट्स, हॉटेलला भेट दिली. यावेळी त्याने वेगवेगळ्या भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतला. त्यानंतर त्याने पोस्ट शेअर करत फूड ब्लॉगर व्हायची इच्छा व्यक्त केली. बंगळुरुमधील स्वादिष्ट आणि फेमस भोजनालयांना भेट दिल्यानंतर विचार करतोय की फूड ब्लॉगर व्हावं, असं कॅप्शन कार्तिकने दिलं आहे.

दरम्यान, कार्तिक लवकरच 'भूलभूलैया 3' , 'आशिकी 3', आणि 'हेरा फेरी 3' या सिनेमांमध्ये झळकणार आहे. त्यामुळे सध्या तो सातत्याने चर्चेत येत आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाअन्न