Join us

करिश्मा कपूरने शेअर केला थ्रोबॅक Video, बॅकग्राउंडला डान्स करताना दिसला शाहिद कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 16:35 IST

करिश्मा कपूरचा हा व्हिडीओ तिच्या सुपरहिट 'दिल तो पागल है' सिनेमातील आहे. यात बघू शकता की, करिश्मा कपूर किती एनर्जीने धमाकेदार डान्स करत आहे.

बॉलिवूडची एकेकाळची सुपरस्टार  करिश्मा कपूर आता सिनेमात जास्त अ‍ॅक्टिव नाही. पण सोशल मीडियावर ती चांगलीच अ‍ॅक्टिव राहते. ती जेव्हाही काही पोस्ट शेअर करते तेव्हा ती व्हायरल होते. करिश्मा कपूरने एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती डान्सरसोबत डान्स करताना दिसत आहे. याच व्हिडीओची खास बाब म्हणजे यात शाहिद कपूर बॅकग्राउंडला डान्सरमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

करिश्मा कपूरचा हा व्हिडीओ तिच्या सुपरहिट 'दिल तो पागल है' सिनेमातील आहे. यात बघू शकता की, करिश्मा कपूर किती एनर्जीने धमाकेदार डान्स करत आहे. सोबतच शाहिद कपूरसोबत इतरही डान्सर तिला साथ देत आहेत. करिश्माने हा व्हिडीओ तिच्या ऑफिशिअल अकाऊंटवर शेअर केलाय. आणि आतापर्यंत या व्हिडीओला ८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. करिश्माचे फॅन्स भरभरून यावर प्रतिक्रियाही देत आहेत.

करिश्मा कपूरने १९९१ मध्ये 'प्रेम कैदी' सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर तिने अनेक सिनेमात धमाकेदार काम केलं होतं. ती बॉलिवूडची त्यावेळची सर्वात टॉपची अभिनेत्री होती. आता तिने 'मेंटलहुड'च्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू केलं. तेच शाहिद कपूरबाबत सांगायचं तर त्याचा 'जर्सी' हा सिनेमा येणार आहे.  या सिनेमात शाहिद क्रिकेटरी भूमिका साकारणार आहे. या सिनेमात शाहिदचे वडील पंकज कपूर हे सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

 

टॅग्स :शाहिद कपूरकरिश्मा कपूरबॉलिवूडसोशल व्हायरल