Join us

करिश्मा कपूरचं खरं नाव आहे भलतंच! इतक्या वर्षांपासून सगळेच करताएत चुकीचा उच्चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 12:34 IST

करिश्मा कपूरचं खरं नाव ऐकून पंकज त्रिपाठीही झाले शॉक, तर सारा अली खान म्हणाली...

बॉलिवूडमध्ये 90 च्या काळ खूप मनोरंजनात्मक होता. एकापेक्षा एक कलाकार, एकापेक्षा एक चित्रपट यामुळे सिनेरसिकही खूश असायचे. त्याच काळात एका अभिनेत्री सौंदर्य, नृत्य आणि अभिनय अशा सर्वच गुणांमुळे प्रेक्षकांची लाडकी बनली होती. ती म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor). करिश्मा तेव्हाची आघाडीची अभिनेत्री होती. सलमान, शाहरुख, गोविंदा, अक्षय कुमार अशा सर्वच अभिनेत्यांसोबत तिची जोडी उत्तम जमली. तिने मोठ्या पडद्यावर जादूच केली होती. पण तुम्हाला माहितीये का इतक्या वर्षांपासून आपण सगळेच तिच्या नावाचा चुकीचा उच्चार करत आहोत? नुकतंच तिने हा खुलासा केला आहे.

करिश्मा कपूरने 1991 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं. कपूर घराण्यातील मुली सिनेमात काम करत नाहीत हा समज तिने मोडून काढला. 'प्रेम कैदी' सिनेमातून तिने डेब्यू केला. यानंतर 'जिगर','अनाडी','राजा बाबू','कूली नंबर १' अशा अनेक सिनेमात अभिनय केला. तिच्या पावलावर पाऊल ठेवत नंतर बहीण करीना कपूरही सिनेसृष्टीत आली. त्यांना 'लोलो' आणि 'बेबो' अशी नवी ओळखही मिळाली. पण लोलो म्हणजेच करिश्मा कपूरच्या नावाचा उच्चार वेगळाच आहे. इतक्या वर्षांपासून आपण करिश्मा असं म्हणत होतो पण खरा उच्चार तर 'करिझ्मा' असा आहे. तिच्या इंग्लिश स्पेलिंग मध्ये Karishma असं नसून Karisma असं आहे. नेटफ्लिक्सला दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा केला. तिचा 'मर्डर मुबारक' सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. यावेळी मुलाखतकाराने तिला नावाचा खरा उच्चार विचारला. यावर तिने हे उत्तर दिलं. तिचं उत्तर ऐकून सगळेच शॉक झाले. पंकज त्रिपाठी म्हणाले, 'मला तर आजच कळतंय.' तर सारा अली खान म्हणाली, 'इतकी वर्ष तू कोणालाच करेक्ट केलं नाहीस का?' तर करिश्मा म्हणाली, 'ठिके आत बरीच वर्ष झाली. मला काही प्रॉब्लेम नव्हता ते प्रेमानेच बोलवतात ते बोलवू दे.' तर विजय वर्मा म्हणाला, 'काहीही असो मी तर लोलोच म्हणतो.'

करिझ्मा आणि करिना कपूर दोघीही बहिणी बॉलिवूडच्या स्टार अभिनेत्री आहेत. करीना अजूनही सक्रीय आहे तर करिझ्मा काही काळाच्या ब्रेकनंतर पुन्हा स्क्रीनवर आली आहे. 

टॅग्स :करिश्मा कपूरबॉलिवूड