Join us

सैफ अली खानबद्दल बोलताना करीनाच्या डोळ्यात आलं पाणी, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 16:58 IST

करीना सैफबद्दल बोलताना भावूक झालेली व्हिडिओत दिसते.

'कॉफी विद करण' (Koffee With Karan 8) च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी हजेरी लावली. करण जोहरने आपल्या हटके प्रश्नांनी दोघांसोबत भरपूर मजामस्ती केली. शोमध्ये सैफ आणि शर्मिला यांनी कुटुंबातील अनेक किस्से सांगितले. जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खानचा (Kareena Kapoor) एक व्हिडिओ चालवला गेला. यामध्ये सैफबद्दल बोलताना तिच्या डोळ्यात अश्रू आल्याचं दिसत आहे.

करीना सैफबद्दल बोलताना भावूक झालेली व्हिडिओत दिसते. ती म्हणते,'सैफ माझ्यासाठी काय आहे? तो माझं जग आहे. माझं पूर्ण आयुष्य त्याच्याभोवतीच फिरतं. जेव्हा पण मी त्याच्याविषयी बोलते तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं. तो माझं आयुष्य आहे.' करीनाचं बोलणं ऐकून सैफ आपल्या छातीवर हात ठेवतो. तो हे ऐकून खूपच खूश होतो. 

करीनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तसंच चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. 'करीना खरंच सैफवर खूप प्रेम करते','काय जोडी आहे' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

करीना शर्मिला टागोर यांच्याबद्दलही म्हणाली,'मी सैफला भेटले तेव्हापासूनच शर्मिला यांना अम्मा म्हणायचे. त्या खूप केअरिंग आणि प्रेमळ आहेत. मला त्यांच्यासोबत छान वाटतं. त्या माझ्यावर सबा आणि सोहासारखंच प्रेम करतात.'

सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी 2012 मध्ये लग्न केले. त्याआधी ते ५ वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आज त्यांना जेह आणि तैमूर ही दोन गोंडस मुलं आहेत.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान बॉलिवूडकरण जोहर