करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सिनेसृष्टीत सुपर अॅक्टीव्ह असते. जिकडे तिकडे बेबो ची चर्चा असतेच. करीना गेल्यावर्षी 'सिंघम अगेन' मध्ये दिसली. तर आता ती साऊथ सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित आगामी 'दायरा' सिनेमात करीना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत कोण आहे माहितीये का?
सध्या साऊथ सिनेमा आणि तिथल्या कलाकारांना चांगलाच भाव मिळतोय. तिथले कलाकार हिंदीतही काम करत आहेत. मेघना गुलजारच्या 'दायरा' या आगामी सिनेमात करीना कपूर साऊथ सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारनसोबत (Prithviraj Sukumaran) स्क्रीन शेअर करणार आहे. नुकतंच करीनाने मेघना आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे. यामध्ये ती आणि पृथ्वीराज इंटेन्स लूकमध्ये दिसत आहेत. यासोबत ती लिहिते, "मी नेहमी म्हणते की मी दिग्दर्शकाची अभिनेत्री आहे. यावेळी मी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शिका मेघना गुलजारसोबत काम करण्यासाठी खूप आतुर आहे. तसंच उत्कृष्ट कलाकार पृथ्वीराज सुकुमारन ज्याचं कामाची मी चाहती आहे त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मला आनंद होत आहे. माझी ड्रीम टीम, दायरा. चला सुरु करुया."