Join us

एकेकाळी राहुल गांधींना डेट करायची करीना कपूरची होती इच्छा, जुना Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 14:51 IST

करीनाचा व्हिडिओ आता पुन्हा व्हायरल होत आहे.

एक काळ असा होता जेव्हा अनेक तरुणी काँग्रेस नेता राहुल गांधींवर जीव ओवाळून टाकायच्या. त्यांच्या लूक्सने तरुणींना भुरळ घातली होती. आजही अनेक मुलगी त्यांच्या चाहत्या आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा (Kareena Kapoor) एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये करीनाने चक्क राहुल गांधींना (Rahul Gandhi)  डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर अनेकांना आश्चर्य वाटत आहे. 

काही वर्षांपूर्वी करीनाने सिमी गरेवालला (Simi Garewal) मुलाखत दिली होती. यामध्ये करीनाला विचारण्यात आलं की जर तुला कोणाला डेट वर नेण्याची संधी मिळाली तर तू कोणाची निवड करशील? यावर करीना म्हणाली, "मी हे सांगितलं पाहिजे की नाही माहित नाही. हे वादग्रस्त तर होणार नाही ना. मला राहुल गांधींसोबत जायला आवडेल. मला त्यांच्याशी ओळख करुन घ्यायला आवडेल."

ती पुढे म्हणाली, "राहुल राजकीय परिवारातून येतात आणि मी फिल्मी कुटुंबातून येते. अशात आमच्यात चांगली चर्चा होऊ शकते." करीनाच्या या उत्तरावर सिमी गरेवालही शॉक होते. त्या काळी राहुल गांधी खरोखरंच अनेक तरुणींचे क्रश होते. 

अगदी करीना कपूरलाही त्यांच्याशी ओळख करुन घेण्याचा मोह आवरला नाही जे तिने थेट मुलाखतीत बोलून दाखवलं. नंतर मात्र ती या वक्तव्यापासून नेहमीच दूर पळायची.  अर्थात ही मुलाखत बरीच जुनी म्हणजे 2009 सालची आहे. जेव्हा करीना बॉलिवूडमध्ये स्थिरावली होती. तसंच तिचं सैफशी लग्नही झालं नव्हतं. सध्या करीनाचा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

टॅग्स :करिना कपूरराहुल गांधीबॉलिवूडसोशल मीडिया