Join us
Daily Top 2Weekly Top 5

नक्कीच हा शेवट नाही… रेडी स्टेडी गो! करिना कपूरच्या पोस्टनं वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 15:00 IST

करीना कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने मोठी माहिती चाहत्यांना दिली आहे.

बॉलिवूडची 'बेबो अर्थात करीना कपूर. करीना कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांच्या मनात घर केलं. बॉलिवूडची ‘पॉव्हरफूल’ अभिनेत्री म्हणून करीना कपूर हिची ओळख आहे. नुकतेच करिनाचा  'जाने जान' हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला. यातील तिच्या भुमिकेचं कौतूकही झालं. आता करिना पुन्हा एका चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे. 

करीनाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो एका सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचा आहे. फोटोमध्ये करीना एका ठिकाणी उभी आहे. तर तिच्यासमोर एक गाडी हवेत उडताना दिसत आहे. तर कॅप्शनमध्ये तिने लिहलं की, ‘मला सांगायची गरज आहे का, मी कोणत्या सिनेमाचं शुटिंग करत आहे? तो माझ्या सर्वात आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्याच्यासोबत माझा हा चौथा सिनेमा आहे… नक्कीच हा शेवट नाही… रेडी स्टेडी गो…’. तर करिनाच्या पोस्टवर रणवीर सिंगने कमेंट केली आहे. त्याने म्हटलं की, ‘रोहित सरांसोबत हा तुमचा चौथा असेल, पण माझा तुमच्यासोबतचा हा पहिलाचं सिनेमा आहे.’ यावरुन हा फोटो सिंघमच्या शुटिंगदरम्यानचा असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावलायं. 

'सिंघम अगेन'या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता वाढत चालली आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग हे मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. आता आणखी एक जुनी व्यक्तिरेखा या चित्रपटाच्या माध्यमातून परत आली आहे. 'सिंघम रिटर्न्स'मध्ये दिसलेली करीना कपूर खान आता 'सिंघम अगेन'मधून पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 

टॅग्स :करिना कपूरबॉलिवूडसिनेमा