प्रसिद्ध निर्माता करण जोहर सध्या चर्चेत आहे. यावर्षी त्याने मेट गाला या आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये पदार्पण केलं. मेट गालामधील त्याच्या लूकची खूप चर्चा झाली. मनीष मल्होत्राने त्याचा लूक डिझाईन केला होता. आता करण जोहर अमेरिकेहून नुकताच परतला आहे. दरम्यान मुंबई विमानतळावर आल्यावर त्याचा एकंदर लूक, अॅटिट्यूड पाहून नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे.
साधत त्याला 'शोबाजी' करणारा व्यक्ती म्हटले आहे.
मुंबई विमानतळावर आल्यावर करण जोहर वेगळ्याच पेहरावात दिसला. त्याने बॅगी ट्राउझर, जॅकेट आणि डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घातली होती. मात्र त्याच्या हातातील लक्झरी बॅगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते , ज्याची किंमत लाखांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. करणचा हा विचित्र पेहराव आणि बॅग दाखवण्याची पद्धत पाहून अनेकांना हसू अनावर झाले. यावरुन सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
नेटकऱ्यांनी करणच्या या लूकवर सडकून टीका केली आहे. एका युजरने कमेंट करताना लिहिले की, "करणला असे का वाटते की लोक फक्त संपत्तीमुळे आकर्षित होतात?आमच्यातील काही जण प्रतिभेलाही महत्त्व देतात आणि कपडे घालणे ही काही प्रतिभा नाही." तर दुसऱ्या एका युजरने उपरोधिकपणे म्हटले की, "करणला अटेंशन आवडते, पण त्याने मेट गालासाठी खास गालिचाच नेसल्यासारखे वाटतेय." काहींनी तर बॉलिवूडमध्ये केवळ शोबाजी उरली असून दाक्षिणात्य चित्रपट अधिक दर्जेदार असल्याचेही मत व्यक्त केले.
करण जोहरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, निर्माता म्हणून तो सध्या 'चांद मेरा दिल' आणि 'नागझिला' या चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे. 'चांद मेरा दिल'मध्ये अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर 'नागझिला' या चित्रपटात कार्तिक आर्यन झळकणार आहे. व्यावसायिक पातळीवर जरी तो सक्रिय असला, तरी सध्या मात्र त्याच्या फॅशन सेन्समुळे त्याला टीकेचा धनी व्हावे लागत आहे.
Web Summary : Karan Johar faced backlash after his airport appearance following the Met Gala. His outfit and luxury bag drew criticism, with netizens calling him 'showy.' Users mocked his fashion sense, contrasting it with South Indian cinema's quality.
Web Summary : मेट गाला के बाद करण जौहर एयरपोर्ट पर अपने लुक और महंगी बैग के कारण ट्रोल हुए। नेटिज़न्स ने उन्हें 'दिखावटी' कहा और उनके फैशन सेंस की आलोचना की, साथ ही दक्षिण भारतीय सिनेमा की गुणवत्ता की सराहना की।