Join us

'कॉफी विथ करण 8'मध्ये शाहरुख खान लावणार हजेरी? करण जोहर म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 19:07 IST

दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याचा लोकप्रिय शो 'कॉफी विथ करण 8 मुळे चर्चेत आहे.

बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याचा लोकप्रिय शो 'कॉफी विथ करण 8' मुळे चर्चेत आहे. बऱ्याच सेलिब्रिटीजनी करणच्या या शोवर हजेरी लावलेली आहे. तरी करणच्या प्रत्येक सीझनमध्ये हजेरी लावणाऱ्या शाहरुख खानची कमतरता प्रेक्षकांना अधिक भासू लागली आहे. आठव्या सीझनमध्येसुद्धा शाहरुख खान दिसणार याची चर्चा होती, परंतु अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर न आल्याने चाहते संभ्रमात पडले आहेत. याबद्दल आता खुद्द करण जोहरनेच खुलासा केला आहे. 

 एका मीडिया इव्हेंटमध्ये करण म्हणाला, 'मला एवढंच माहीत आहे की, गरज असेल तेव्हा बोलण्याचा अधिकार कोणी मिळवला असेल तर तो शाहरुख खान आहे. मी त्याचा सर्वात जवळचा मित्र आणि कुटुंबाचा भाग आहे. मी त्याला विचारू शकतो आणि विनंती करू शकतो. तो मला कधीच नाही म्हणत नाही. म्हणूनच मी कधीच विचारले नाही. मला नाही म्हणावं लागेल अशा स्थितीमध्ये मला त्याला टाकायचे नाही'. 

पुढे तो म्हणाला, 'तो माझ्यासाठी जगात खूप महत्त्वाचा आहे. योग्य वेळ आल्यावर मी त्याला विचारेन आणि जेव्हा त्याला बोलण्यास सोयीस्कर वाटेल तेव्हाच तो शोमध्ये येईल. तो खूप चांगली मुलाखत देतो. जेव्हा तो कोणत्याही व्यासपीठावर बोलतो, तेव्हा सर्व ऐकतात. तो खऱ्या अर्थाने केवळ पडद्यावरच नाही तर पडद्याबाहेरही बादशाह आहे'.

'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर आतापर्यंत दीपिका पादुकोण-रणवीर सिंह, सनी देओल-बॉबी देओल, सारा अली खान- अनन्या पांडे, काजोल-राणी, करीना-आलिया आणि वरुण-सिद्धार्थ यांनी हजेरी लावली आहे. करणच्या टॉक शोच्या आगामी भागात कियारा अडवाणी व विकी कौशल हजेरी लावणार आहेत. डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक ‘कॉफी विथ करण’चे सगळे भाग पाहू शकतात.

टॅग्स :करण जोहरशाहरुख खानबॉलिवूडसेलिब्रिटी