Join us

आई-बाबा मला माफ करा...,सुसाईड नोट लिहून टीव्ही अभिनेत्रीनं डिप्रेशनमुळे संपवलं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 16:41 IST

Actress Soujanya ends life, commits suicide : चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीसाठी धक्कादायक बातमी...

ठळक मुद्देसौजन्याने अनेक प्रसिद्ध कन्नड मालिकांमध्ये काम केले होते. साऊथच्या काही चित्रपटांमध्येही ती झळकली होती.

चित्रपट व टीव्ही इंडस्ट्रीसाठी धक्कादायक बातमी आहे. कन्नड टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री सौजन्या (Soujanya) हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे. बेंगळुरूस्थित राहत्या घरी तिचा पंख्याला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.तिच्या खोलीचा दरवाजा बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, तिचा मृतदेह पंख्याला लटकेला दिसला. आत्महत्येपूर्वी सौजन्याने सूसाईड नोटही लिहिली होती. पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे.

सौजन्या बेंगळुरूच्या कुंबलगोडू येथील एका अपार्टमेंटमध्ये एकटी राहत हाती. ती मूळची कोडगू जिल्ह्याच्या कुशलनगर येथे राहणारी होती. सूसाईड नोटमध्ये सौजन्याने कुटुंबीयांची माफी मागितली आहे. 27 सप्टेंबरला तिने ही नोट लिहिली होती. मम्मी-पापा मला माफ करा. मला कोणताही आजार नाही. पण मी मानसिक आजारांशी लढतेय. आता मला सहन होत नाहीये, अशा आशयाची नोट तिने लिहिली आहे.सौजन्याने अनेक प्रसिद्ध कन्नड मालिकांमध्ये काम केले होते. साऊथच्या काही चित्रपटांमध्येही ती झळकली होती. सौजन्याने ज्या लोकांसोबत काम केलं आहे त्यांच्याकडून पोलिस आता सुगावा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सौजन्याच्या आत्महत्येने कन्नड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेकांना तिच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री जयश्री रमैया हिनेही आत्महत्या केली होती. मानसिक आजार आणि संघर्ष हेही तिच्या आत्महत्येमागील कारण असल्याचं मानले जात होतं.  या वर्षाच्या सुरुवातीला ‘बिग बॉस कन्नड’ फेम चैत्र कुटूरनेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीटेलिव्हिजन