Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचं बँकॉकमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, शॉपिंग करुन येताना....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 12:42 IST

बँकॉकमध्ये निधन झाल्याने सध्या तिचं पार्थिव भारतात आणण्यासाठी वेळ लागतोय.

कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता विजय राघवेंद्रच्या (Vijay Raghvendra) पत्नीचं अचानक निधन झालं. यामुळे कन्नड मनोरंजनसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. माध्यम रिपोर्टनुसार विजय आपल्या कुटुंबासोबत थायलंडला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. तिथेच शॉपिंगवरुन परत आल्यावर त्याच्या पत्नीला हृदयविकाराचा झटका आला. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

अभिनेता विजय राघवेंद्रच्या पत्नीचं नाव स्पंदना (Spandana) असं होतं. बँकॉकमध्ये निधन झाल्याने सध्या तिचं पार्थिव भारतात आणण्यासाठी वेळ लागतोय. उद्यापर्यंत तिचे पार्थिव बंगळुरुमध्ये पोहोचवले जाईल. विजय राघवेंद्र पत्नी स्पंदना आणि मुलगा शौर्यसोबत व्हॅकेशन एन्जॉय करत होता. याच महिन्यात त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. तिच्या अचानक मृत्यूने त्याला चांगलाच धक्का बसला आहे. अनेक जण या कठीण काळात त्याला धीर देत आहेत.

विजयची पत्नी स्पंदनाने देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. रविचंद्रन यांच्या 'अपूर्वा' सिनेमात तिने कॅमिओ केला होता. विजय आणि स्पंदनाचं 2007 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांना शौर्य हा मुलगा झाला. विजय कन्नड सिनेमातील सुपरस्टार आहे. 'चिन्नारी मुथा' सिनेमातील त्याच्या अभिनयासाठी त्याला खूप पसंत केले गेले. विजयला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. 

टॅग्स :मृत्यूबॉलिवूड