Join us

भाजपाने दिली होती तिकिटाची ऑफर, पण...; कंगनाने सांगितली 'राजकारण की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 14:51 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्यामुळे ब़ॉलिवूड अभिनेत्री झाली ट्रोल... नेटिझन्सना सडेतोड उत्तर दिले..

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं चित्रपट क्षेत्रातील घराणेशाहीवर  जोरदार टीका केली. बॉलिवूडमध्ये बाहेरच्या लोकांना संधी दिली जात नाही आणि स्टार किड्सनाच संधी दिली जाते, यावरून कंगनानं अनेक अभिनेते, प्रोड्युसर आणि चित्रपट निर्मात्यांवर निशाणा साधला. एवढंच नाही तिनं सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सडेतोड मत मांडताना मुंबई पोलीस अन् राज्यातील काही नेत्यांवरही टीका केली. त्यामुळे ती सतत चर्चेत राहिली आहे. पण, या काळात तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन केले आणि त्यावरून आता तिला ट्रोल केले जात आहे. ट्रोलर्सना तिनं सडेतोड उत्तर दिले. 

Independence Day 2020 : व्हॉट अ‍ॅन आयडिया सर जी; भाज्यांपासून तयार केला तिरंगा; पाहा फोटो

कंगना म्हणाली,''मला राजकारणात यायचं आहे, म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत आहे, असे अनेकांना वाटतं. त्यामुळे मला ट्रोल केले जात आहे. मी त्या सर्वांना सांगू इच्छिते की, माझे आजोबा 15 वर्ष काँग्रेसचे आमदार होते. राजकारण्यांमध्ये माझे घर एवढे लोकप्रिय आहे की, गँगस्टर चित्रपटानंतर मला काँग्रेसकडून ऑफर मिळत होती.''

World Record : ट्वेंटी-20त चार चेंडूंत चार विकेट्स, मिळवला पहिला मान; मलिंगा, रशीद खान यांच्या पंक्तित स्थान

ती पुढे म्हणाली,''मणिकर्णिकानंतर मला भाजपानेही तिकिट ऑफर केली होती. पण, माझं माझ्या कामावर प्रेम आहे. त्यामुळे राजकारणात जाण्याचा मी विचार करत नाही. मी राजकारणात जाण्याच्या प्रयत्नात आहे, असे ज्यांना वाटतं त्यांनी आता मला ट्रोल करणं थांबवावं.''    

IPL 2020 : मुंबई इंडियन्सनं खेळाडूंसाठी बूक केलंय आलिशान हॉटेल; RCB, CSKचा कमी नाही थाट! 

जर्मन कंपनीनं ज्या कामासाठी मागितले 50 लाख, ते काम आपल्या इंजिनियर्सनी केलं दीड लाखात! 

Independence Day 2020 : इरफान पठाणच्या एका ट्विटनं जिंकली लाखो मनं; खेळाडूंकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

टॅग्स :कंगना राणौतभाजपा