Join us
Daily Top 2Weekly Top 5

 कंगना राणौतच्या बहिणीने ओतले आगीत तेल! ऋचा चड्ढाला म्हटले ‘जॉबलेस अ‍ॅक्ट्रेस’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 12:30 IST

कंगना राणौतच्या वतीने मैदानात उतरलेली तिची बहिण रंगोली सध्या एकापाठोपाठ एक अनेकांवर बेछूट आरोप करत सुटलीय.  काही दिवसांपासून रणबीर कपूर, आलिया भट, करण जोहर, हृतिक रोशन अशा सगळ्यांना रंगोलीने लक्ष्य केले. रंगोलीचे ताजे लक्ष्य ठरली तर अभिनेत्री ऋचा चड्ढा.

ठळक मुद्दे कंगना सध्या तिच्या ‘मेंटल है क्या’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तिचा ‘पंगा’ सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कंगना राणौतच्या वतीने मैदानात उतरलेली तिची बहिण रंगोली सध्या एकापाठोपाठ एक अनेकांवर बेछूट आरोप करत सुटलीय.  काही दिवसांपासून रणबीर कपूर, आलिया भट, करण जोहर, हृतिक रोशन अशा सगळ्यांना रंगोलीने लक्ष्य केले. रंगोलीचे ताजे लक्ष्य ठरली तर अभिनेत्री ऋचा चड्ढा.

 ऋचा कंगनाला उद्देशून बोलली आणि तशी ती रंगोलीच्या हिटलिस्टवर आली. ‘मी सरसकट सगळ्यांसोबत शाब्दिक भांडणावर विश्वास ठेवत नाही.  एखाद्या व्यक्तीबाबत तक्रार असेल तर मी त्यांच्या समोर जाऊन बोलेन,’असे  ऋचा म्हणाली.  ऋचाच्या या वक्तव्यावर कंगनाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण रंगोलीला मात्र मिरच्या झोंबल्या. तिने नेहमीप्रमाणे एकापाठोपाठ एक असे अनेक टिष्ट्वट करत,  ऋचाला लक्ष्य केले. केवळ इतकेच नाही तर  ऋचाला ‘बेरोजगार अभिनेत्री’ म्हणत तिने तिच्यावर टीका केली.

‘ मी ऐकले की, ऋचा चड्ढासारख्या अनेकांना कंगनाचे स्पष्ट बोलणे खटकते. त्यांच्यामते कंगनाने सार्वजनिक ठिकाणी बोलणे चुकीचे आहे. पण मी त्यांना विचारू इच्छिते की, तुमच्याकडे आणखी कोणता पर्याय आहे का ? तुम्ही स्वत:च्या हिंमतीवर आजपर्यंत काही कमावले आहे का?’ असे रंगोलीने  ऋचाला लक्ष्य करताना लिहिले.

‘बॉलिवूडमधील अनेक कलाकार या लढाईत हारले पण कंगना ही लढाई जिंकली. कारण तिने वयाच्या १४ व्या वर्षांपासून स्वत:च्या मेहनतीने स्वत:ला तयार केले, असेही रंगोलीने एका ट्वीटमध्ये म्हटले. कंगना सध्या तिच्या ‘मेंटल है क्या’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तिचा ‘पंगा’ सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

टॅग्स :कंगना राणौतरिचा चड्डा