Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाची बहीण रंगोलीने या अभिनेत्रीला म्हटले ‘सस्ती कॉपी’, अनुराग कश्यपने असे दिले उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 10:50 IST

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिची बहीण रंगोली चंदेल कायम चर्चेत असते. मुद्दा कुठलाही असो रंगोली बहीणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि याच नादात रोज नवनवे वाद ओढवून घेते.

ठळक मुद्देगतवर्षी तापसी कंगनाबद्दल बोलली होती. कंगलाला गिफ्ट द्यायचे झाल्यास तू काय देशील, असा प्रश्न तिला केला गेला होता. यावर मी तिला डबल फिल्टर देईल, असे ती म्हणाली होती. तापसीचे हे उत्तर रंगोली कदाचित विसरलेली नाही.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिची बहीण रंगोली चंदेल कायम चर्चेत असते. मुद्दा कुठलाही असो रंगोली बहीणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि याच नादात रोज नवनवे वाद ओढवून घेते. गेल्या अनेक दिवसांपासून रंगोली बॉलिवूडच्या वेगवेगळ्या स्टार्सला या ना त्या कारणाने लक्ष्य करतेय. यावेळी तिने अभिनेत्री तापसी पन्नूला लक्ष्य केले आहे.बुधवारी कंगनाचा आगामी चित्रपट ‘जजमेंटल है क्या’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. तापसी पन्नूने हा ट्रेलर पाहिला आणि तिला तो आवडला. तिने ट्वीटरवर कंगनाच्या या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रशंसा केली.

‘ट्रेलर फारच कूल आहे. याच्याकडून कायम मोठ्या अपेक्षा होत्या आणि हा पैसा वसूल आहे, ’ असे तापसीने लिहिले. पण कंगनाच्या बहीणीला हे कौतुकही खटकले. तापसीच्या या ट्वीटच्या बदल्यात रंगोलीने तिला ‘सस्ती कॉपी’ म्हटले. ‘काही लोक कंगनाला कॉपी करून आपले दुकान चालवतात. पण कंगनाच्या चित्रपटाची प्रशंसा करताना साधा तिच्या नावाचा उल्लेख करतानाही ते कचरतात. मी तापसीला अखेरचे ऐकले होते, तेव्हा कंगनाला दुप्पट फिल्टरची गरज आहे, असे ती म्हणाली होती. तापसीजी तुला ‘सस्ती कॉपी’ करणे बंद करायला हवे,’असे रंगोलीने लिहिले.

तापसी यावर काही बोलली नाही. पण तिच्या बाजूने दिग्दर्शक अनुराग कश्यप मैदानात उतरला. ‘रंगोली, हे खरोखर 'अती' होतय. हे खूपच दु:खद आहे. यावर काय लिहू, हेही मला कळत नाहीये. तुझी बहीण आणि तापसी दोघींसोबतही काम केल्यानंतर मी केवळ एवढेच सांगेल की,एका ट्रेलरची प्रशंसा म्हणजे त्यातील सर्व गोष्टींची प्रशंसा होते. यात कंगनाही आलीच,’ असे अनुरागने ट्वीटरवर लिहिले.गतवर्षी तापसी कंगनाबद्दल बोलली होती. कंगलाला गिफ्ट द्यायचे झाल्यास तू काय देशील, असा प्रश्न तिला केला गेला होता. यावर मी तिला डबल फिल्टर देईल, असे ती म्हणाली होती. तापसीचे हे उत्तर रंगोली कदाचित विसरलेली नाही. याचमुळे तिने तापसीला लक्ष्य केले. आता हा वाद कुठपर्यंत जातो, ते बघूच.

टॅग्स :कंगना राणौतमेंटल है क्यातापसी पन्नूअनुराग कश्यप