मुंबई: अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातलं वाकयुद्ध गेल्या काही दिवसांपासून थांबलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना प्रकरण आपल्यासाठी संपल्याचं म्हटलं होतं. मात्र आता कंगनानं राऊत यांनी पुन्हा एकदा डिवचलं आहे. कंगनानं दसऱ्यानिमित्त तिच्या मुंबईतल्या कार्यालयाचा फोटो ट्विट करत राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता राऊत कंगनाला प्रत्युत्तर देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे."मुख्यमंत्री ठाकरे कोरोना लसीचं राजकारण करण्याइतके कोत्या मनाचे नाहीत"काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना राणौत यांच्यात जुंपली होती. यानंतर आता दसऱ्याच्या शुभेच्छा देताना कंगनानं संजय राऊतांना लक्ष्य केलं आहे. कंगनानं ट्विटरवर हनुमानाच्या मूर्तीचा आणि मुंबईतल्या कार्यालयाचा फोटो शेअर केला आहे. 'माझी तुटलेली स्वप्नं तुमच्या चेहऱ्यासमोर हसत आहेत संजय राऊत. पप्पू सेना माझं घर तोडू शकते. पण माझ्या आत्म्यावर घाला घालू शकत नाही. बंगला क्रमांक ५ आज सत्याचा असत्यावर विजय साजरा करत आहे,' असं म्हणत कंगनानं दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.शरद पवार अन् राज ठाकरे पुन्हा एकाच मंचावर येणार; संजय राऊतही सामील होणार
ऑफिस अन् हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगनाचा संजय राऊतांवर निशाणा; म्हणाली...
By कुणाल गवाणकर | Updated: October 25, 2020 13:47 IST