Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kangana Ranaut : कपाळावर गंध, गळ्यात माळ, अक्षय कुमारनंतर कंगना राणौतही बाबा केदारनाथांच्या दर्शनाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 16:01 IST

महादेवांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर कंगनाने हर हर महादेवचा जयघोष केला.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने बुधवारी बाबा केदारनाथ मंदिरात जाऊन भगवान शंकराचं दर्शन घेतले. तिने स्वतः सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली आहे. तिने केदारनाथ मंदिरात दर्शन जाऊन आशीर्वाद घेतला आहे. महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर कंगनाने हर हर महादेवचा जयघोष केला.

कंगनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये कपाळाला पिवळ्या रंगाचे गंध लावल्याचे दिसून येत आहे. यासोबतच तिने हर हर महादेवचा घोषही केला. बाबा केदारनाथांच्या दर्शनाच्या आनंद अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो आहे.   कंगनाला पाहण्यासाठी मंदिरा बाहेर गर्दी झाली होती. कंगनासाठी तिथे सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली असली तरी मंदिरात ती सर्वसामान्य भाविकांसह त्याच्या रंगात रंगलेली दिसतेय.

कंगनाने विधींवत बाबांची अभिषेक पूजा केली आणि त्यांच्याकडे आर्शीवाद मागितले. मंगळवारी अभिनेता अक्षय कुमारही बाबा केदारनाथांच्या दर्शनासाठी पोहोचला होता. आज अभिनेत्री कंगना रणौत यांनी केदारनाथांचं दर्शन घेतलं. याआधी कंगना हरिद्वारला पोहोचली होती. जिथे ती गंगा आरतीमध्ये तल्लीन झालेली दिसली. याआधी सारा अली खानसह साऊथ अभिनेत्रीही केदारनाथ धाममध्ये पोहोचल्या होत्या. 

टॅग्स :कंगना राणौतकेदारनाथअक्षय कुमार