Join us
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याभरातच कोरोनामुक्त झाला सोनू सूद, कंगणा म्हणाली व्हॅक्सिनसाठीही लोकांना करावे जागरुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 11:50 IST

कोरोनामुळे पुन्हा एकदा लोकांच्या जगण्यावर मर्यादा आल्या आहेत. अशात तासन् तास दिवसरात्र टीव्ही पाहण्याशिवाय अनेक लोकांजवळ पर्याय नाहीत.

देशात करोनामुळे भयंकर परिस्थिती आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात १५ दिवसांचा लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेक बॉलिवूड कलाकार देखील करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. कोरोना काळात लोकांसाठी देवदूत बनलेला सोनू सूदलाही करोनाची लागण झाली होती.

 

सोनू सूदला कोरोना झाल्याचे समजताच त्याच्या चाहत्यांना त्याची चिंता वाटत होती आणि ते काळजी घ्यायला सांगत होते. तसेच त्याची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून त्यांनी प्रार्थना केली होती.परंतु, आता त्याने करोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. महत्वाचं म्हणजे त्याने फक्त आठ दिवसांत करोनावर मात केली आहे. सोनू सूदने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यात तो सगळ्यांचे आभार मानत आहे.

बॉलिवूड क्वीन कंगणा रोणातने पुन्हा एकदा ट्विट केले आहे. यावेळी तिने सोनू सूदला ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये लोकांना आता व्हॅक्सिन घेण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचे तिने म्हटले आहे. कंगणाने म्हटले की, सोनूजी तुम्ही पहिला व्हॅक्सिनचा डोस घेतला आणि त्यामुळेच लवकरात लवकर कोरोनामुक्तही झाले. भारतात बनलेल्या व्हॅक्सिनची तुम्हाला कौतुक करायला हवे. इतकेच नाही तर आता लोकांनाही लस घेण्यासाठी सांगितले पाहिजे.

 

तेव्हाच तर जगू शकाल...! पर्याय नाही, पण सोनू सूदने दिलेला 'हा' सल्ला पटतो का पाहा!!

कोरोनामुळे पुन्हा एकदा लोकांच्या जगण्यावर मर्यादा आल्या आहेत. अशात तासन् तास दिवसरात्र टीव्ही पाहण्याशिवाय अनेक लोकांजवळ पर्याय नाहीत. पण टीव्हीवरच्या कोरोनाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूजचा भडीमार लोकांच्या चिंतेत भर घालतोय. अशात सोनू सूदने लोकांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.टीव्ही रिमोट सोडा, देश जोडा. दुस-यांचा जीव वाचवाल, तेव्हा तर जगू शकाल, असे त्याने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. याआधी सोनूने पुन्हा आपल्या गावाकडे निघालेल्या मजुरांबद्दल चिंता व्यक्त केली होती. 

टॅग्स :कंगना राणौतसोनू सूद