Join us

Kangana Ranaut ने केला खुलासा, 'या' अफवांमुळे होत नाहीये तिचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 15:55 IST

Kangana Ranaut Talk about her Wedding: आतापर्यंत कंगनाने तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत काही सांगितलं नाही. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने याचा खुलासा केला की, ती लग्न का करत नाहीये.

Kangana Ranaut Talk about her Wedding: कंगना रणौत (Kangana Ranaut) च्या 'धाकड' सिनेमाचा ट्रेलर लोकांना चांगलाच पसंत पडला. २० मे रोजी हा सिनेमा रिलीज होत आहे. तेच कंगना तिच्या सिनेमांसोबतच आपल्या बिनधास्त आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. पण जेव्हा तिच्या पर्सनल लाइफबाबत विषय निघतो तेव्हा ती कमी बोलते. आतापर्यंत कंगनाने तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत काही सांगितलं नाही. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने याचा खुलासा केला की, ती लग्न का करत नाहीये.

कंगना रणौतने सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान मुलाखतीत सांगितलं की, अखेर ती लग्न का करू शकत नाहीये? कंनगाने चिमटा काढत सांगितलं की, अफवांमुळे ती लग्न करू शकत नाहीये. तिने सांगितलं की, अशा अफवा आहेत की, 'मी मुलांना मारते'. कंगना म्हणाली की, या अफवांमुळे तिच्याबाबत एक धारणा बनवण्यात आली जी स्पेशल व्यक्तीला रोखत आहे.

या मुलाखतीत कंगना म्हणाली की, 'असं नाहीये की, रीअल लाइफमध्ये मी कुणाला मारेल? मी लग्न करू शकत नाहीये कारण तुमच्यासारखे लोक या अफवा पसरवत आहेत'. काही दिवसांपूर्वी कंगनाने आपल्या फ्यूचरबाबत वक्तव्य केलं होतं. ती 'टाइम्स नाउ'सोबत बोलताना म्हणाली की, तिला पुढील ५ वर्षात स्वत:ला आईच्या रूपात बघायचं आहे. कंगना म्हणाली की, 'मला लग्न करायचं आहे आणि मुलंही हवी आहेत. मला स्वत:ला पाच वर्षात आई आणि पत्नीच्या रूपात बघायचं आहे'. 

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूड