अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात पाऊल टाकलेली 'क्वीन' कंगना राणौत ही नेहमीच चर्चेत असते. कोणतीही भीडभाड न ठेवता कोणत्याही विषयावर ती अगदी स्पष्टपणे बोलतान दिसते. सोशल मीडियावरही ती सक्रीय असेत. अलिकडेच पाकिस्तान आणि भारतादरम्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये कंगना भारतीय सैन्यासाठी कायम पोस्ट करताना दिसून आली. "दहशतवाद्यांनी भरलेला एक भयानक, दुष्ट देश… जगाच्या नकाशावरून मिटवून टाकला पाहिजे", असं म्हणत तिनं पाकिस्तावर टीका केली होती. आता कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
कंगनान हिनं Gen Z Pulse नावाच्या एका इंस्टाग्राम पेजवरचा व्हिडीओ आपल्या स्टोरीवर शेअर केला आहे. हा एक स्ट्रीट इंटरव्ह्यू आहे. या व्हिडीओमध्ये एक अँकर एका गटात उभ्या असलेल्या तरुणींना 'भारताचे राष्ट्रपती कोण आहेत?' असा साधा प्रश्न विचारते. यावर एक मुलगी उत्तर देते, 'मी त्यांचं नाव विसरले', तर दुसरी मुलगी म्हणते, 'मुरुनाली... मला माहित नाही... मुरुनु किंवा असेच काहीतरी'. तर एकीनं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं नाव घेतलं. इतकंच नाही तर एका तरुणीनं थेट 'जवाहरलाल नेहरू' हे उत्तर दिलं. विशेष म्हणजे नेहरू कधीच राष्ट्रपती नव्हते, ते देशाचे पहिले पंतप्रधान होते. या व्हिडीओमध्ये 'राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू' हे उत्तर एकही तरुणी देऊ शकली नाही. त्यांची बेजबाबदार आणि गोंधळलेली उत्तरं कंगना राणौतनं संताप व्यक्त केलाय.
कंगनानं लिहलं, "युद्ध आपल्याला मारणार नाही, पण गवती किड्यांच्या मेंदूचे पेशी निर्माण करणारी पिढी नक्कीच संपवेल". एकिकडे भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे, भारतीय सैन्य हे सामान्य नागरिकां सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत आहे. तर दुसरीकडे नव्या पीढीचं हे सामान्य ज्ञान पाहून कंगना चांगलीच नाराज झाली आहे.
कंगनाचा हॉलिवूड डेब्यू
कंगनाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंगना आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून ती 'Blessed Be The Evil' या हॉरर चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच न्यू यॉर्कमध्ये सुरू होणार आहे. यासोबतच कंगना खासदार म्हणून 'मंडी'चा कारभार पाहतेय.