Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : कंगना रणौत पुन्हा मुंबईत दाखल, पण यावेळी दिसला एक फरक....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 09:41 IST

काही दिवसांपूर्वी कंगना आपल्या मनाली येथील घरी होती. याआधी ती तिच्या 'थलायवी' सिनेमाचं शूटींग करण्यात बिझी होती.

कंगना रणौत पुन्हा एकदा तिच्या पूर्ण सिक्युरिटीसहीत नव्या वर्षाच्या ठिक आधी मुंबईत परतली आहे. कंगना रणौतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ती तिच्या परिवारासोबत मुंबई एअरपोर्टवर दिसत आहे आणि तिच्या चारही बाजूने सिक्युरिटी तैनात दिसत आहे. मात्र तिची सुरक्षा आधीपेक्षा कमी झाल्याची दिसत आहे. 

काही दिवसांपूर्वी कंगना आपल्या मनाली येथील घरी होती. याआधी ती तिच्या 'थलायवी' सिनेमाचं शूटींग करण्यात बिझी होती. त्यानंतर तिने 'तेजस' सिनेमाच्या शूटींगलाही सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी कंगनाने सांगितले की, ती जानेवारी २०२१ मध्ये तिच्या आगामी 'धाकड' सिनेमाचं शूटींग सुरू करणार आहे. या सिनेमात कंगना एजंट अग्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

कंगना रणौत ही गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरूनही तिने काही अपमानकारक पोस्ट शेअर केल्या होत्या. ज्यावरून तिला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. ट्विटर यूजर्ससहीत अनेक बॉलिवूड कलाकारांनीही तिला ट्रोल केलं होतं. दिलजीत दोसांज आणि कंगनातील ट्विटर वॉर अजूनही चर्चेचा विषय आहे. दरम्यान याआधी जेव्हा कंगना मुंबईत आली होती तेव्हा तिला Z दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. पण ती सुरक्षा काढून घेतल्याचे दिसते. 

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडसोशल व्हायरल