Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाने 'तेजस'सिनेमावर काम केलं सुरू, सिनेमाच्या वर्कशॉपचा व्हिडीओ केला शेअर

By अमित इंगोले | Updated: October 27, 2020 11:21 IST

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या आगामी 'तेजस'काम सुरू केलं आहे. तिने याची माहिती सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून दिली

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या आगामी 'तेजस'काम सुरू केलं आहे. तिने याची माहिती सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून दिली. या व्हिडीओत सिनेमाचे दिग्दर्शक सर्वेश मेवाडा आणि विंग कमांडर अभिजीत गोखलेसोबत ती एका वर्कशॉपमध्ये चर्चा करताना दिसत आहे.

कंगनाने रणौतने सोमवारी तिच्या ट्विटर हॅंडलवर 'तेजस' सिनेमाच्या वर्कशॉप व्हिडीओ शेअर केलाय. कंगनाने या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिले की 'आज तेजसच्या टीमसोबत वर्कशॉपला सुरवात केली. टॅलेंटेड दिग्दर्शक सर्वेश  मेवाडा आणि आमचे कोच विंग कमांडर अभिजीत गोखले यांच्यासोबत बोलून आनंद झाला'. (कंगनाचा उद्धव ठाकरेंना 'व्हिडिओ' मेसेज; म्हणाली - काल तुम्ही तुमच्या भाषणात मला शिवी दिली...!)

तेजस सिनेमात कंगना पहिल्यांदाच एका फायटर पायलटी भूमिका साकारणार आहे. इंडियन एअर फोर्स २०१६ मध्ये महिलांना लढाऊ भूमिकेत सहभागी करून घेणारी देशातील डिफेन्स फोर्स होती. हा सिनेमा याच ऐतिहासिक घटनेवर आधारित असेल.

कंगना रणौत 'तेजस' सोबतच तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिक 'थलायवी' मध्येही दिसणार आहे. यात ती जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील तिचा लूक काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच कंगना 'धाकड' सिनेमातही दिसणार आहे.

मुख्यमंत्र्यांवर पुन्हा निशाणा

दरम्यान, महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्यात सुरू असलेल्या वादाने पुन्हा एकदा भडका घ्यायला सुरुवात केली आहे. दसरा मेळाव्यात मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना रणौतवर न‍िशाना साधा. यानंतर, कंगनानेही ठाकरेंना तत्काळ प्रत्युत्तर दिले. तिने आधी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 'नेपोटिझ्मचे सर्वात बेकार प्रोडक्‍ट' म्हटले, तर आता तिने आपला एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कंगना शिवसेनेला उघड-उघड 'सोनिया सेना' म्हणताना दिसत आहे. 

या व्हिडिओमध्ये कंगनाने म्हटले आहे, की "उद्धव ठाकरे, तुम्ही मला काल तुमच्या भाषणात शिवी दिली.  नमकहराम म्हणालात. यापूर्वीही 'सोनिया सेने'च्या अनेक लोकांनी मला उघड पणे शिवी दिली आहे, मला धमकावले आहे. माझा जबडा तोडण्यासंदर्भात भाष्य केले आहे. मला मारून टाकणे, अथवा हरामखोर म्हणणे अशा प्रकारच्या अनेक असभ्य शिव्या मला सोनिया सेनेने दिल्या आहेत. मात्र, स्त्रीसशक्तिकरणाचे ठेकेदार गप्प राहिले. त्याच भाषणात तुम्ही हिमाचलसंदर्भात, जी माता पार्वतीची जन्‍मभूमी आहे, त्यांना हिमाचल कन्या, म्हटले जाते, भगवान श‍िव शंकरांची कर्मभूम‍ी आहे, आजही येथल्या कणा-कणात श‍िव-पार्वती यांचा वास आहे, याला देवभूमीही म्हटले जाते. यासंदर्भात आपण एढे तुच्छ भाष्य केले. एक मुख्‍यमंत्री असूनही आपण संपूर्ण राज्याची प्रतिमा खाली आणली. कारण आपण एका मुलीवर नाराज आहात आणि अशी मुलगी, जी आपल्या मुलाच्या वयाची आहे."

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूड