Join us

हनिमून अर्ध्यावर सोडून घरी परतला होता अजय देवगण; काजोलने सांगितला घडलेला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 11:20 IST

Ajay devgn: हनिमूनला गेल्यानंतर अजयसोबत असं काही घडलं ज्यामुळे त्याने तात्काळ पुन्हा घरी येण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूडमधील परफेक्ट कपल म्हणून अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल (kajol) या जोडीकडे कायम पाहिलं जातं. या जोडीच्या लग्नाला बरीच वर्ष झाली आहेत. मात्र, त्यांच्यातली मैत्री आजही कायम आहे. त्यामुळेच बरेचदा ते एकमेकांची मस्करी करतांना दिसून येतात. शांत स्वभावाच्या अजयची काजोल कायमच फिरकी घेत असते. त्यामुळे त्यांचे अनेक रंजक किस्से चाहत्यांना माहित आहेत. यामध्येच काजोलची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये काजोलने त्यांच्या हनीमूनला घडलेला मजेशीर किस्सा सांगितला.

काजोल आणि अजय या जोडीने १९९९ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ही जोडी हनिमूनला गेली होती. मात्र, अजयला तिथे गेल्यानंतर चक्क घरची आठवण यायला लागली. त्यामुळे त्यांनी ऐनवेळी हनिमूनचा प्लॅन कॅन्सल केला आणि ते परत घरी आले.

हनिमून सोडून घरी आला अजय

लग्नानंतर अजय आणि काजोल यांना जवळपास २ महिन्यांचा हनिमून प्लॅन केला होता. 'लग्नानंतर तू मला वेगवेगळ्या ठिकाणी फिरवशील का?' असं काजोलने लग्नापूर्वीच अजयला विचारलं होतं. त्यावर त्यानेही होकार दिला. त्यामुळे लग्नानंतर त्यांनी खरोखरच २ महिन्यांचा हनिमून प्लॅन केला. पण, ज्यावेळी ते प्रत्यक्षात फिरायला निघाले त्यावेळी अजयला घरची आठवण येऊ लागली आणि, २ महिन्यांचा त्यांच्या हनिमून ४० दिवसांमध्येच संपला.

दरम्यान, हनिमूनला गेल्यावर अजय आजारी पडला होता त्यामुळे त्याला घरची आठवण येत होती. म्हणूनच त्यांनी हनिमून अर्ध्यावर सोडला आणि ते पुन्हा घरी आले. अजय अलिकडेच शैतान या सिनेमात झळकला होता. त्यानंतर लवकरच तो 'सिंघम अगेन', 'रेड 2', 'दे दे प्यार दे 2' या सिनेमात झळकणार आहे.

टॅग्स :बॉलिवूडअजय देवगणकाजोलसेलिब्रिटीसिनेमा