Join us

जुनैद खान-खुशी कपूरची केमिस्ट्री अन् रोमान्स...; 'लव्हयापा' चित्रपटातील रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 13:08 IST

जुनैद खान आणि खुशी कपूर स्टारर 'लव्हयापा' सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Loveyapa Movie New Song: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि श्रीदेवी यांची धाकटी लेक खुशी कपूर या दोन स्टार किड्सच्या नावाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. जुनैद खान आणि खुशी कपूर त्यांचा आगामी सिनेमा 'लव्हयापा'मुळे प्रसिद्धीझोतात आले आहेत. नव्या पिढीची हटके प्रेमकहाणी प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये 'लव्हयापा' बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. जुनैद-खुशी या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. अलिकडेट सिनेमाचं टायटल सॉंग रिलीज झालं या गाण्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता 'लव्हयापा' मधील आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलंय. 

बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर 'लव्हयापा' मधील 'Rehna Kol' हे रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यामधील जुनैद  आणि खुशी कपूर यांची केमिस्ट्रीने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. जुबिन नौटियाल आणि जहरा एस खान यांनी गाण्याला आपला आवाज दिला आहे तर गुरप्रीत सैनी यांनी गाण्याचे स्वर रचले आहेत. त्याचबरोबर फराह खान गाण्याच्या कोरिग्राफर आहेत. 

'लव्हयापा' सिनेमात जुनैद खान, खुशी कपूर आणि आशुतोष राणा यांची प्रमुख भूमिका दिसतेय. याशिवाय कॉमेडियन किकू शारदाही सिनेमात खास भूमिकेत दिसतोय. हा सिनेमा व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर ७ फेब्रुवारीला रिलीज होतोय.

टॅग्स :खुशी कपूरआशुतोष राणाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा