Join us

डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 09:17 IST

'जॉली एलएलबी ३'मधील न्यायाधीश त्रिपाठी उर्फ सौरभ शुक्लाचा एक मजेदार व्हिडीओ समोर आला आहे.

Jolly Llb 3 Teaser Date Out: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) अभिनीत 'जॉली एलएलबी ३'ची (Jolly LLB 3) घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.  'जॉली एलएलबी ३' चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

जगप्रसिद्ध कोर्टरूम कॉमेडी सीरिज जॉली एलएलबी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदा डावपेच आणि विनोदाचा डबल डोस मिळणार आहे. कारण, 'जॉली एलएलबी ३' मध्ये एक नाही, तर दोन जॉली म्हणजेच अक्षय कुमार आणि अर्शद वारसी एकत्र दिसणार आहेत. एका मजेशीर व्हिडीओच्या माध्यमातून चित्रपटाचा टीझर कधी येणार, याबद्दलही सांगितलं आहे. 

'जॉली एलएलबी ३'मध्ये अभिनेता अर्शद वारसी हा जगदीश त्यागी आणि अक्षय कुमार हा जगदीश्वर मिश्रा या लोकप्रिय भुमिकेत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत. 'जॉली एलएलबी ३'मधील न्यायाधीश त्रिपाठी उर्फ सौरभ शुक्लाचा एक मजेदार व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सौरभ शुक्ला हे जबरदस्त विनोदी अंदाजात प्रेक्षकांना 'जॉली एलएलबी ३' अपडेट देताना दिसलेत. दोन जॉली एकत्र आल्यानंतर काय होणार, याबद्दल त्यांनी भाष्य केलंय. तर 'जॉली एलएलबी ३'चा अधिकृत टीझर १२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. तर १९ सप्टेंबर २०२५ रोजी चित्रपट प्रदर्शित (Jolly LLB 3 Release Date) होणार आहे.

"जॉली एलएलबी" हा एक प्रसिद्ध हिंदी चित्रपट आहे, जो सुभाष कपूर यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. यात अर्शद वारसी, बोमन इराणी, अमृता राव आणि सौरभ शुक्ला यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर"जॉली एलएलबी" चा दुसरा भाग "जॉली एलएलबी २" २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता.हे दोन्ही सिनेमे खूप गाजले आणि आता 'जॉली एलएलबी ३' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात दोन जॉली एकत्र असल्यानं मोठा धमाका होणार हे नक्की. 

टॅग्स :अक्षय कुमारअर्शद वारसीसिनेमा