Join us

'या' ओटीटीवर घरबसल्या मोफत पाहू शकता 'जॉली एलएलबी' आणि 'जॉली एलएलबी २'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 17:46 IST

'जॉली एलएलबी ३' अखेर आज १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.

बहुप्रतिक्षित चित्रपट 'जॉली एलएलबी ३' अखेर आज १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना एक अनोखी जुगलबंदी पाहायला मिळत आहे. कारण या फ्रँचायझीमधील दोन्ही लोकप्रिय वकील, म्हणजेच  'जॉली एलएलबी'मधील अर्शद वारसी आणि 'जॉली एलएलबी २' मधील अक्षय कुमार पहिल्यांदाच एकाच कोर्टरूममध्ये समोरासमोर उभे ठाकले आहेत. मात्र, काही प्रेक्षकांनी अजूनही या फ्रँचायझीचे जुने भाग पाहिले नाहीत. तर काही चाहते असे आहेत, ज्यांना पुन्हा एकदा जुने भाग पाहण्याची इच्छा आहे. त्यामुळे, तिसरा भाग पाहण्याआधी, पहिले दोन भाग  कुठल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येतील, याबद्दल आपण जाणून घेऊया. 

'जॉली एलएलबी' हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अर्शद वारसी आणि अमृता राव यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर"जॉली एलएलबी" चा दुसरा भाग "जॉली एलएलबी २" २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. हे दोन्ही सिनेमे खूप गाजले. 'जॉली एलएलबी' आणि जॉली एलएलबी २'  हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. हे दोन्ही चित्रपट तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney+ Hotstar) वर पाहू शकता. 

प्रेक्षकांना कसा वाटला 'जॉली एलएलबी ३'?

'जॉली एलएलबी ३' हा फक्त एक कॉमेडी सिनेमा नसून त्यातून एका महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य केलं गेलं आहे. सोशल मीडियावर सिनेमाचं प्रचंड कौतुक होत आहे. दरम्यान, जॉली एलएलबी ३ सिनेमाचं दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलं आहे. या सिनेमात अक्षय कुमार, अर्शद वारसी, सौरभ शुक्ला, गजराज राव, अमृता राव, सीमा बिस्वास, हुमा कुरैशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :अक्षय कुमारअर्शद वारसीबॉलिवूड