Join us

Box Office Collection Day 3: बॉक्स ऑफिसवर 'जर्सी'चं राज्य; तिसऱ्या दिवशी यशस्वी घोडदौड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 16:07 IST

Box office collection: RRR आणि KGF चॅप्टर 2 नंतर काही दिवसांमध्येच शाहिदचा 'जर्सी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाली.

कबीर सिंह'च्या उत्तुंग यशानंतर शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) 'जर्सी' (Jersey) या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरलेल्या या चित्रपटाने तिसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे.

RRR आणि KGF चॅप्टर 2 नंतर काही दिवसांमध्येच शाहिदचा 'जर्सी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाली. काहींच्या मते हा चित्रपट RRR आणि KGF चॅप्टर 2 च्या तुलनेत सरासरी आहे. तर, काहींना या चित्रपटाचं कथानक कमालीचं आवडलं.  त्यामुळे पहिल्या दिवशी या चित्रपटाने सरासरी कमाई केली. मात्र, आता तोच वेग चांगला वाढल्याचं दिसून येत आहे.

नेमकी किती आहे जर्सीची कमाई? 

पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ ४ कोटींचा बिझनेस केला. मात्र, त्यानंतर कमाईच्या आकड्यांनी वेग घेतला. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ५.५० ते ५.७५ पर्यंत कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी तब्बल ६ ते७ कोटींची कमाई केली.त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ९.५० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट अजूनही कमाई करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, ६० कोटींमध्ये तयार करण्यात आलेला हा चित्रपट २१०० स्क्रीनवर रिलीज करण्यात आला. या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत झळकला आहे. 

टॅग्स :शाहिद कपूरसिनेमाबॉलिवूडसेलिब्रिटी