जया प्रदा (Jaya prada) हे नाव कोणासाठीही नवीन नाही. बॉलिवूडचा एक काळ गाजवणाऱ्या जया प्रदा यांचं फिल्मी करिअर जितकं गाजलं तितकंच त्यांचं पर्सनल आयुष्यही चर्चेत राहिलं. कलाविश्वासह त्यांची राजकीय कारकिर्दही तितकीच गाजली. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची कायम या ना त्या कारणाने चर्चा होत असते. सध्या त्यांचा आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यातील वादाचा किस्सा चर्चिला जात आहे. या दोघींमधील वाद एकेकाळी इतका रंगला होता की जवळपास २५ वर्ष त्या एकमेकींशी बोलत नव्हत्या.
जया प्रदा आणि श्रीदेवी (sridevi) या दोघींनीही दाक्षिणात्य कलाविश्वातून त्यांच्या करिअरची सुरुवात केली. साऊथ इंडस्ट्री गाजवल्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये लोकप्रियता कमवत असतांनाच या दोघींमध्ये एका सिनेमामुळे वादाची ठिणगी पडली.
नागीन सिनेमामुळे पडली दोघींमध्ये फूट
'नागीन' हा सिनेमा प्रथम जया प्रदा यांना ऑफर झाला होता. मात्र, त्यानंतर त्यांच्याऐवजी त्यात श्रीदेवीला घेण्यात आलं. या प्रकारामुळे जया प्रदा आधीच नाराज होत्या. त्यातच हा सिनेमा सुपरहिट ठरल्यामुळे त्यांची नाराजी आणखीनच वाढली. पुढे याच नाराजीचं रुपांतर वादामध्ये झालं. त्यांचा वाद इतका विकोपाला गेला की जवळपास २५ वर्ष त्या एकमेकींशी बोलत नव्हत्या. या २५ वर्षांत त्यांनी अनेक सिनेमा एकत्र केले. मात्र, एकमेकींशी अबोला ठेऊनच त्यांनी हे सिनेमा पूर्ण केले.
२०१५ मध्ये संपला दोघींमधील वाद
२५ वर्ष एकमेकींशी अबोला धरलेल्या या अभिनेत्रींमधील हे शीतयुद्ध २०१५ मध्ये संपुष्टात आलं. जया प्रदा यांच्या लेकाच्या लग्नात अभिनेत्रीने श्रीदेवीला निमंत्रण पाठवलं. विशेष म्हणजे श्रीदेवीनेही याचा मान ठेवला. आणि, ती लग्नाला उपस्थित राहिली.
Web Summary : Jaya Prada and Sridevi, initially South Indian stars, clashed in Bollywood. A 'Nagin' film offer ignited a 25-year silence. Reconciliation occurred in 2015 at Jaya Prada's son's wedding, ending their cold war.
Web Summary : जया प्रदा और श्रीदेवी, जो पहले दक्षिण भारतीय सितारे थीं, बॉलीवुड में भिड़ गईं। 'नागिन' फिल्म के प्रस्ताव ने 25 साल की चुप्पी को जन्म दिया। 2015 में जया प्रदा के बेटे की शादी में सुलह हुई, जिससे उनकी शीत युद्ध समाप्त हो गया।