Join us

बिग बींचं सोशल मीडिया प्रेम, पण जया बच्चन यांना इतका तिटकारा का? म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 13:23 IST

जया बच्चन या रोखठोक बोलतात म्हणून त्यांच्या वक्तव्यांची कायम चर्चा होते.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) वयाच्या 80 व्या वर्षीही सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय असतात. ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. तरुण पिढी असो  किंवा मध्यमवयीन सर्वांनाच बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्ट आवडतात. ते या वयात इतकं काम करत आहेत हे पाहून सर्वांनाच प्रेरणा मिळते. तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) मात्र या सगळ्यापासून दूरच असतात. यामागचं कारण त्यांनी स्वत:च सांगितलं आहे.

नात नव्या नवेली नंदा हिच्या पॉडकास्टमध्ये नुकतंच जया बच्चन यांनी सोशल मीडियाबाबत मत मांडलं आहे. नव्याच्या पॉडकास्टचा प्रोमो नुकताच आला. जया बच्चन या कुटुंबातील एकमेव व्यक्ती आहेत ज्या सोशल मीडियापासून दूर आहेत. यावर त्या म्हणाल्या, "आपल्याला स्वत:बद्दल अजून जास्त सांगण्याची गरज नाही. जगाला आपल्याबद्दल आधीच बरंच काही माहित आहे."

त्या पुढे म्हणाल्या, "आमच्या काळात कॉल बुक करावा लागायचा. हे दोन प्रकारचे कॉल असायचे. एक नॉर्मल आणि दुसरा इमर्जन्सी. जर तुम्ही बॉयफ्रेंडशी बोलत असाल तर तो इमर्जन्सी कॉल असला पाहिजे." तेव्हा श्वेता नंदा म्हणते, "आम्ही मोठे होत असताना इंटरनेट असायला हवं होतं. होमवर्क आणि बाकी गोष्टी सोप्या झाल्या असत्या."

 

टॅग्स :जया बच्चनसोशल मीडियाअमिताभ बच्चननव्या नवेली