Atle Kumar Share Post: तामिळ फिल्म इंडस्ट्रीमधील नव्या दमाच्या सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून अॅटलीला ओळखलं जाते. ‘जवान’ आणि ‘थेरी’ सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक अॅटली कुमार आणि त्यांची पत्नी प्रिया अॅटली यांनी नुकतीच चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत राहणारा दिग्दर्शक अॅटली त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अॅटली आणि त्याची पत्नी प्रिया यांना कन्यारत्न प्राप्त झालं असून ते दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत.
दिग्दर्शक अॅटलीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर सुंदर फोटो पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. लेकीच्या जन्मानंतर दिग्दर्शकांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. "आम्हाला, प्रिया आणि ॲटलीला, कन्यारत्न प्राप्त झाले आहे. असं सुंदर कॅप्शन देत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. अॅटली आणि प्रियाने ही गोड बातमी शेअर करताच सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, अॅटली कुमार हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहे.'थेरी','आ २','बिगिल' अशा गाजलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन त्याने केलं आहे. साऊथसोबतच जवान, बेबी जॉन या बॉलिवूड सिनेमांचं दिग्दर्शनही अॅटलीने केलं आहे. २०१४ मध्ये अॅटली आणि प्रियाने लग्न करत संसार थाटला. २०२३ मध्ये प्रियाने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर आता त्यांच्या घरी लेकीच्या रुपाने लक्ष्मीचं आगमन झालं आहे.
Web Summary : Director Atlee Kumar and wife Priya are blessed with a baby girl after 12 years of marriage. The couple shared the happy news on social media, receiving congratulations from fans and celebrities. Atlee, known for hits like 'Jawan,' married Priya in 2014.
Web Summary : निर्देशक एटली कुमार और पत्नी प्रिया को शादी के 12 साल बाद एक बेटी का आशीर्वाद मिला है। दंपति ने सोशल मीडिया पर खुशखबरी साझा की, प्रशंसकों और मशहूर हस्तियों से बधाई मिली। 'जवान' जैसी हिट फिल्मों के लिए जाने जाने वाले एटली ने 2014 में प्रिया से शादी की।