Join us

'जवान'चं रोमँटिक गाणं रिलीज, शाहरुख अन् साऊथ ब्युटी नयनताराच्या केमिस्ट्रीवर नेटकरी फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 14:37 IST

'इश्क हो बेहिसाब सा, बेपरवाह, बेहद सा! कुछ ऐसा है जवान का प्यार!

शाहरुख खान (Shahrukh Khan) आगामी 'जवान' (Jawan) सिनेमामुळे चर्चेत आहे. साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटलीने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. यामध्ये साऊथ कलाकारांची मांदियाळी आहे. अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) जवानमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर अभिनेत्री प्रियमणी आणि साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती देखील सिनेमात झळकणार आहेत. नुकतंच 'जवान'मधील पहिलं रोमँटिक गाणं रिलीज झालं आहे. 'चलेया' असे गाण्याचे बोल असून यामध्ये शाहरुख आणि नयनताराचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय.

'जवान' सिनेमाचा काही दिवसांपूर्वी प्रिव्यू रिलीज झाला. तेव्हापासूनच चाहत्यांची उत्सुकता ताणली होती. आता नवीन रिलीज झालेल्या गाण्यामुळे रोमान्सचा बादशाह शाहरुख खानच्या चाहत्यांची आतुरता आणखी वाढली आहे.  'इश्क हो बेहिसाब सा, बेपरवाह, बेहद सा! कुछ ऐसा है जवान का प्यार! असं कॅप्शन त्याने दिलं आहे. गाण्यातील शाहरुख आणि नयनतारा चलेया गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. नयनताराने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलंय.

‘जवान’ हा हिंदीतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे, त्याने त्याचा पहिला हिंदी चित्रपट म्हणून सह-लिखित आणि दिग्दर्शित केलेला आहे. शाहरुखची पत्नी गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत चित्रपटाची निर्मिती केली आहे. सिनेमात दीपिका पदुकोणचाही कॅमिओ रोल आहे. तर मराठी अभिनेत्री गिरीजा ओकचीही यामध्ये भूमिका आहे. ७ सप्टेंबर रोजी 'जवान' प्रदर्शित होतोय.

टॅग्स :शाहरुख खाननयनताराबॉलिवूड