Join us

"मी तिच्याकडे पैसे..." कंगनासोबतचा कोर्टातील वाद मिटल्यावर जावेद अख्तर काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 14:13 IST

५ वर्ष सुरु असलेली कोर्ट केस मिटल्यावर कंगना राणौतबद्दल जावेद अख्तर यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे (kangana ranauat, javed akhtar)

कंगना राणौत (kangana ranaut) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. कंगनाला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. गेल्या काही दिवसांपासून कंगना चांगलीच चर्चेत होती. कारण कंगना आणि सुप्रसिद्ध गीतकार-पटकथाकार जावेद अख्तर (javed akhtar) यांच्यातला कोर्टातील वाद गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आला. अखेर या वादावर तोडगा निघाला आणि जावेद-कंगना यांच्यात सामंजस्य झालं. अखेर या सर्व प्रकरणावर जावेद अख्तर यांनी मौन सोडलंय.कंगनाचा वाद मिटल्यावर जावेद अख्तर काय म्हणाले?

कंगनासोबत ५ वर्षांचा कोर्टाचा खटला मिटल्यावर जावेद अख्तर एका मुलाखतीत म्हणाले की, "हा हे प्रकरण आता मिटलं आहे. कंगनाने तिचं वक्तव्य आणि आरोप मागे घेतले आहेत. कंगनाने मला वचन दिलंय की ती असं पुन्हा कधी करणार नाही. मला जो त्रास झाला त्याबद्दल तिने माफीही मागितली याशिवाय केस मागे घेतली. मी तिच्याजवळ पैशांची मागणी केली नव्हती. मला फक्त तिच्याकडून माफी हवी होती." कोर्टाच्या निर्णयावर जावेद साब आनंदी आहेत का? असं विचारताच ते मिश्किल अंदाजात म्हणाले की,"आता पुन्हा नव्या संकटाला मी आमंत्रण देऊ का?"

कंगना-जावेद यांच्यातील वाद नेमका काय?अशाप्रकारे जावेद अख्तर यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. कंगना आणि जावेद यांच्यातील प्रकरण २०१६ चं होतं. ज्यावेळी कंगना-हृतिक रोशन यांच्यातील वाद गाजला होता. तेव्हा जावेद अख्तर यांनी एक मीटिंग बोलावून कंगनाला हृतिकची माफी मागायला सांगितलं होतं. जावेद अख्तर यांनी माझ्यावर हृतिकची माफी मागण्यासाठी दबाव टाकला, असा आरोप करुन कंगनाने तक्रार दाखल केली. पुढे जावेद यांनी कंगनावर मानहानीची केस दाखल केली. अखेर मध्यस्थी करुन सामंजस्याने कंगना-जावेद अख्तर यांच्यातील वाद मिटला आहे.

 

टॅग्स :कंगना राणौतजावेद अख्तरबॉलिवूडन्यायालय