Javed Akhtar Slams Grand Welcome To Taliban Minister: अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी भारताच्या दौऱ्यावर आले. ते ९ ते १६ ऑक्टोबर दरम्यान भारतात राहणार आहेत. तालिबानी नेत्याचं भारत भूमीवरील आदरातिथ्य पाहून बॉलिवूडचे ज्येष्ठ पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमिर खान मुत्ताकी आणि त्यांचं स्वागत करणारं भारत सरकार, मुत्ताकी यांना "इस्लामिक हिरो" म्हणणाऱ्या देवबंद संस्थेवर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली.
जावेद अख्तर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी लिहलं, "जे लोक (भारत सरकार) प्रत्येक प्रकारच्या दहशतवादाविरोधात उभे राहतात, आता त्यांच्याकडून जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना असलेल्या तालिबानच्या प्रतिनिधीचं भारतात ज्या प्रकारे सन्मानाने स्वागत केलं गेलं, ते पाहून माझी मान लाजेने खाली गेली आहे".
मुत्ताकी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील दारुल उलूम देवबंदला भेट दिली, जिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले होते. दारुल उलूम देवबंद हे दक्षिण आशियातील सर्वात प्रभावशाली इस्लामिक मदरशांपैकी एक आहे. जावेद अख्तर यांनी लिहलं, "देवबंदलाही लाज वाटली पाहिजे, कारण त्यांनी अशा कथित 'इस्लामिक हिरो'चं आदरपूर्वक स्वागत केलं आहे, जो त्या लोकांपैकी एक आहे ज्यांनी अफगाणिस्तानमध्ये मुलींचं शिक्षण पूर्णपणे बंद केलं आहे. माझ्या भारतीय बांधवांनो आणि भगिनींनो, आपल्याला काय झालंय? आपल्या देशात हे काय चाललंय?".
जावेद अख्तर यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेहमीप्रमाणेच संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी त्यांचे समर्थन केलं आहे, तर काही लोक त्यांना ट्रोल करत आहेत. जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले मत मांडण्याची ही पहिली वेळ नाही. दरम्यान, ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला. तेव्हापासून, या देशावर तालिबानचं राज्य आहे. या काळात, महिलांवर असंख्य निर्बंध लादण्यात आले आहेत आणि मानवी हक्कांचं उल्लंघन करण्याचे आरोप सातत्याने या सत्ताकाळावर केले आहेत.
Web Summary : Javed Akhtar criticizes India's welcome of Taliban minister Amir Khan Muttaqi and Deoband for honoring him, highlighting the group's oppressive actions against women in Afghanistan. He questions the values of those extending hospitality to the Taliban.
Web Summary : जावेद अख्तर ने तालिबान मंत्री आमिर खान मुत्ताकी के भारत में स्वागत और देवबंद द्वारा सम्मानित किए जाने की आलोचना की, अफगानिस्तान में महिलाओं के खिलाफ समूह की दमनकारी कार्रवाइयों पर प्रकाश डाला। उन्होंने तालिबान का आतिथ्य करने वालों के मूल्यों पर सवाल उठाया।