Join us
Daily Top 2Weekly Top 5

जावेद अख्तर यांनी केलं बिग बींच्या नातवाचं कौतुक, म्हणाले, 'ऋषी कपूरनंतर...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 12:46 IST

'द आर्चीज' पाहिल्यावर ७० वर्षांच्या एका महिलेच्याही डोळ्यात पाणी आले होते.

लेखक गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar)  यांनी लेक झोया अख्तरने दिग्दर्शित केलेला 'द आर्चीज' (The Archies) सिनेमा नुकताच पाहिला. यावेळी त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नातवाची म्हणजेच अगस्त्य नंदाची (Agastya Nanda) विशेष स्तुती केली. ते स्वत: अगस्त्यची आई श्वेता बच्चन नंदाला जाऊन म्हणाले की 'तुझा मुलगा स्टार बनणार आहे'. यासोबतच जावेद अख्तर यांनी अगस्त्यची तुलना थेट ऋषी कपूर यांच्याशी केली आहे. 

काय म्हणाले जावेद अख्तर?

जावेद अख्तर रेडिफला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, 'अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा माचो, टॉक्झिक अभिनेत्यांसारखा नाहीए. त्याच्यात एक निष्पाप मुलगा दिसतो. द आर्चीज पाहिल्यावर ७० वर्षांच्या एका महिलेच्याही डोळ्यात पाणी आले होते. हा सिनेमा ७ ते ७० अशा सर्वच वयोगटातील लोकांचं प्रतिनिधित्व करते. तसंच आर्चीज कॉमिक्सच्या जगात घेऊन जाते. मलाही माझे तरुणपणीचे दिवस आठवले. '

ते पुढे म्हणाले,'अगस्त्यची भूमिका पाहून मी श्वेता कडे गेलो. तुझा मुलगा एक स्टार होणार आहे. आतापर्यंत हिरोची प्रतिमा म्हणजे टॉक्झिक, माचो अशीच राहिली आहे. पण इथे एक निष्पाप हिरो दिसतो. बॉबीमधील ऋषी कपूरनंतर प्रेक्षकांनी अगस्त्य सारखा हिरो पाहिला नाही. अगस्त्य सर्व तरुणांना विशेषत: तरुणींना आवडेल.'

अगस्त्य नंदा श्वेता बच्चन नंदाचा मुलगा आणि अमिताभ बच्चन यांचा नातू आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या 'द आर्चीज' सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तसंच या सिनेमात सुहाना खान आणि खुशी कपूर हे स्टारकीड्सही दिसले. 

टॅग्स :जावेद अख्तरअमिताभ बच्चनबॉलिवूडसिनेमा