Join us
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षांनी मोठ्या Jr NTR बरोबर रोमँटिक झाली जान्हवी कपूर, अभिनेत्रीचा बोल्ड व्हिडिओ पाहून बॉयफ्रेंड म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 11:27 IST

जान्हवीचा या नवीन गाण्याचा व्हिडिओ तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर एका साऊथ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'देवरा : पार्ट १' असं या सिनेमाचं नाव असून यामध्ये ती ज्यु. एनटीआरबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'देवरा' या सिनेमातील जान्हवी आणि ज्यु. एनटीआरचं एक रोमँटिक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. धीरे धीरे असं या गाण्याचे बोल असून यामध्ये जान्हवी आणि ज्यु. एनटीआरचा रोमान्स पाहायला मिळत आहे. 

धीरे धीरे गाण्यात जान्हवीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. अवघ्या काही तासांतच या गाण्याला युट्यूबर मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर सोशल मीडियावरही हे गाणं ट्रेंडिंग असल्याचं पाहायला मिळत आहे. या गाण्यातील जान्हवी आणि ज्यु. एनटीआरची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. त्यांचा ऑनस्क्रीन रोमांस पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

जान्हवीचा या नवीन गाण्याचा व्हिडिओ तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. शिखरने जान्हवीच्या या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जान्हवीच्या बोल्ड अदा पाहून तोदेखील आश्चर्यचकित झाला आहे.

जान्हवी आणि ज्यु. एनटीआरचा हा व्हिडिओ त्याने इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे.  हे गाणं शेअर करत त्याने "wooow" असं म्हटलं आहे. जान्हवी आणि ज्यु. एनटीआरचा हा सिनेमा २७ सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूरज्युनिअर एनटीआरTollywoodसिनेमा