Join us

Video: श्रीदेवीची अखेरची 'ती' निशाणी जान्हवीने घेतली हातावर गोंदवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 18:16 IST

Janhvi kapoor: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या जान्हवीने नुकताच तिचा टॅटू काढतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

ठळक मुद्देया व्हिडीओमध्ये ती 'गोविंदा गोविंदा' असं ओरडताना दिसत आहे.

बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचं (sridevi) निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, अजूनही तिच्या आठवणी चाहत्यांच्या मनातून काही पुसल्या गेलेल्या नाहीत. यात श्रीदेवीची लेक अभिनेत्री जान्हवी कपूरदेखील (janhvi kapoor) वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देत असते. अलिकडेच जान्हवीने श्रीदेवीची आठवण म्हणून हातावर एक खास टॅटू गोंदवून घेतला आहे. 

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या जान्हवीने नुकताच तिचा टॅटू काढतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती 'गोविंदा गोविंदा' असं ओरडताना दिसत आहे. मात्र, ती काढत असलेला टॅटू अत्यंत खास असून श्रीदेवीची ती अखेरची निशाणी असल्याचं म्हटलं जात आहे.

श्रीदेवीने जान्हवीला लिहिलेल्या एका लेटरमधील शेवटच्या ओळी जान्हवीने तिच्या हातावर गोंदवून घेतल्या आहेत. यामध्ये "आय लव्ह यू माय लब्बू", असं श्रीदेवीने तिच्या लेकीसाठी लिहिलं होतं. हीच ओळ जान्हवीने हातावर गोंदवून घेतली आहे.

दरम्यान, श्रीदेवीने जान्हवीसाठी एक खास नोट लिहिली होती. त्यात "आय लव्ह यू माय लब्बू..तू या जगातली सगळ्यात बेस्ट मुलगी आहेस", असं श्रीदेवीने म्हटलं होती. श्रीदेवी, जान्हवीला लाडाने लब्बू म्हणायच्या हे फार कमी जणांना माहित आहे.

टॅग्स :जान्हवी कपूरसेलिब्रिटीसिनेमाइन्स्टाग्राम