Join us

अक्षय कुमारच्या 'रामसेतू'मध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरूचाची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 19:27 IST

अक्षय कुमारने मागील वर्षी दिवाळीला आगामी चित्रपट 'रामसेतु'ची घोषणा केली होती.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मागील वर्षी दिवाळीला आगामी चित्रपट 'रामसेतु'ची घोषणा केली होती. तेव्हापासून या चित्रपटाची चर्चा होताना दिसते आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कोण अभिनेत्री दिसणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. आता चाहत्यांची उत्सुकता संपली असून अक्षय कुमार सोबत एक नाही तर दोन अभिनेत्रींची 'रामसेतु'साठी निवड करण्यात आली आहे. या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा झळकणार आहेत. 

यापूर्वीही जॅकलिन फर्नांडिसने अक्षय कुमारसोबत काम केलेले असून या जोडीला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे. अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिस. ‘हाउसफुल’, ‘हाउसफुल २’, ‘हाउसफुल ३’, ‘ब्रदर्स’सह अनेक चित्रपटांतून त्यांनी एकत्र काम केले आहे. आता ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात ती दिसणार असून ‘राम सेतु’ चित्रपटातही अक्षय कुमारसोबत ती दिसणार आहे. हा त्यांचा एकत्र सातवा चित्रपट असेल.

दुसरीकडे नुसरत भरूचा ही पहिल्यांदाच अक्षयसोबत काम करणार आहे. या चित्रपटासाठी दीर्घ काळापासून अभिनेत्रींचा शोध सुरू होता. आता जॅकलिन आणि नुसरत यांची नावे निश्‍चित करण्यात आली आहे. या दोघींनाही चित्रपटासाठी साइन करण्यात आले आहे. 

अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात जॅकलिन ही सीता, तर अक्षय कुमार हा रामाची भूमिका साकारणार आहे. मात्र नुसरतच्या भूमिकेबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही. हा चित्रपट रामायण आणि भगवान राम यांच्या आदर्शावर आधारित असणार आहे.

टॅग्स :अक्षय कुमारजॅकलिन फर्नांडिसनुसरत भारूचा