बॉलिवूडमध्ये बऱ्याचदा कलाकारांपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिड्सची चर्चा होत असते. यात अनेकदा हे स्टारकिड्स त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चिले जातात. सध्या नेटकऱ्यांमध्ये अभिनेता टायगर श्रॉफची चर्चा होतीये. अभिनेता जॅकी श्रॉफ ( Jackie Shroff ) यांच्या लेकाचं खरं नाव वेगळं असून त्याला टायगर म्हणून का संबोधलं जातं हा प्रश्न अनेकांना पडतो.
आज इंडस्ट्रीमध्ये जॅकी यांच्या मुलाला टायगर याच नावाने ओळखलं जातं. मात्र, त्याचं खरं नाव दुसरचं आहे. विशेष म्हणजे घरी लाडाने ठेवलेलं नावच पुढे त्याची ओळख बनून गेलं. त्यामुळे त्याचं खरं नाव काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये दिसून येते.
काय आहे टायगरचं खर नाव?
टायगर म्हणून लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्याचं खर नाव जयहेमंत श्रॉफ आहे. विशेष म्हणजे इतकं चांगलं नाव असतांनाही टायगर या नावाने हाक मारण्यामागे एक किस्सा आहे.
अभिनेत्याला का म्हणतात टायगर?
लहानपणी टायगर प्रचंड मस्तीखोर होता. कधीही काही झालं की तो हाताच्या पंजाने एखाद्याला मारायचा. त्याच्या याच पंजा मारायच्या स्टाइलमुळे त्याला घरात प्रेमाने टायगर म्हणू लागले. मात्र, पुढे जाऊन हेच नाव त्याची ओळख झालं. दरम्यान, टायगरने २०१४ मध्ये हिरोपंती या सिनेमातून त्याच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं.
Web Summary : Tiger Shroff's real name is Jai Hemant Shroff. He was nicknamed Tiger for his playful habit of playfully scratching like a tiger as a child, and the name stuck. He debuted in Bollywood with Heropanti in 2014.
Web Summary : टाइगर श्रॉफ का असली नाम जय हेमंत श्रॉफ है। बचपन में शरारती होने और हाथ से पंजा मारने की वजह से उन्हें टाइगर नाम मिला, और यही नाम चल पड़ा। उन्होंने 2014 में फिल्म हीरोपंती से बॉलीवुड में डेब्यू किया।