Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दृश्यम' फेम अभिनेत्री लग्नाच्या सहा वर्षांनंतर झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 09:07 IST

बाळाच्या आगमनाने इशिता अन् वत्सल दोघांच्याही कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

मनोरंजनक्षेत्रातील लोकप्रिय जोडी इशिता दत्ता (Ishita Dutta) आणि वत्सल शेठ (Vatsal Seth) आई बाबा झाले आहेत. लग्नाच्या सहा वर्षानंतर इशिताने मुलाला दिला आहे. १९ जुलै रोजी इशिताने गोंडस बाळाला जन्म दिला आणि दोन्ही कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. सध्या आई आणि बाळ दोघेही सुखरुप असून त्यांना उद्यापर्यंत डिस्चार्ज मिळेल अशी माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून इशिता आणि वत्सल दोघांचीही चर्चा होती. इशिताने नेहमीच आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या तब्येतीचे अपडेट्स दिले आहेत. दोघांनी इशिताच्या प्रेग्नंसीची माहितीही अतिशय खास अंदाजात दिली होती. यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. गेल्या मंगळवारीच इशिताने फोटो शेअर करत लिहिले होते, 'ठिक आहे, शेवटचा महिना सोपा नाही.'

28 नोव्हेंबर 2017 रोजी वत्सल शेठ आणि इशिता दत्ता लग्नबंधनात अडकले होते. तर यावर्षी ३१ मार्च रोजी त्यांनी आपल्या पहिल्या बाळाची गुडन्यूज शेअर केली. इशिताचं डोहाळजेवणही थाटात पार पडलं. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो स्पष्ट दिसत होता. अगदी पारंपारिक पद्धतीने डोहाळजेवणाचा कार्यक्रम केल्याने चाहत्यांनी कुटुंबाचं खूप कौतुक केलं होतं. आता त्यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झाल्याने सर्वच आनंदात आहेत.

टॅग्स :टिव्ही कलाकारप्रेग्नंसीसोशल मीडिया