22 वर्षापूर्वी रिलीज झालेला 'कृष्णा कॉटेज' हा सिनेमा अनेकांच्या लक्षात असेल. हॉरर जॉनर असलेला हा सिनेमा त्याकाळी बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता. परंतु, आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. नुकतेच या सिनेमाला २२ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने अभिनेत्री इशा कोप्पीकरने या सिनेमातील काही आठवणींना उजाळा दिला. परंतु, जुन्या गोष्टी सांगत असतांना तिने सेटवर घडलेला भयावह अनुभवही शेअर केला.
कृष्णा कॉटेज या सिनेमात इशा कोप्पीकरसह अनिता हसनंदानी, सोहेल खानदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. या चित्रपटात इशाने दिशा ही भूमिका साकारली होती. मिड-डेच्या रिपोर्टनुसार, या सिनेमाचं चित्रीकरण सुरु असतांना सेटवर अनेक अघटित घटना घडत होत्या. या घटनांचा खुलासा इशाने केला आहे.
''एका सीनमध्ये मला माझ्या को-स्टारला घाबरवायचं होतं. त्यामुळे मी माझ्या व्हॅनिटीमध्ये तयार होत होते. ज्यावेळी मी आवरुन सेटवर पोहोचले त्यावेळी सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. मी गेल्यावर त्यांनी मला विचारलं की, तू मुद्दाम आम्हाला घाबरवत होतीस का? कारण, मी नसतांना सेटवर चित्रविचित्र घटना घडल्या होत्या. मात्र, त्यावेळी मी तर माझ्या व्हॅनिटीमध्ये होते. परंतु, घडलेल्या या सगळ्या प्रकारामुळे सेटवर भीतीचं वातावरण तयार झालं होतं. इतकंच नाही तर त्या सेटवर काहीतरी अनपेक्षित गोष्टी घडतायेत हे सगळ्यांना जाणवलं होतं'', असं इशा म्हणाली.
पुढे ती म्हणते, ''कृष्णा कॉटेजच्या सेटवर आम्हाला कायम अस्वस्थ वाटायचं. खासकरुन मी जेव्हा माझ्या व्हॅनिटीमध्ये ज्याचे त्यावेळी मला सतत असं वाटायचं की कोणीतरी मला चोरून बघतंय. शुटिंग संपल्यावर जेव्हा कॅमेरा ऑफ व्हायचा आणि मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये जायचे तेव्हा माझ्या घशात फार विचित्र पद्धतीने दुखायला सुरुवात व्हायची. ज्यामुळे मला खूप अस्वस्थ वाटायचं.''
Web Summary : Esha Koppikar recalls eerie experiences on 'Krishna Cottage' set 22 years ago. Strange occurrences and a constant feeling of being watched created unease among the cast and crew during filming.
Web Summary : ईशा कोप्पिकर ने 22 साल पहले 'कृष्णा कॉटेज' के सेट पर डरावने अनुभवों को याद किया। फिल्म निर्माण के दौरान अजीब घटनाएं और लगातार देखे जाने की भावना ने कलाकारों और क्रू के बीच बेचैनी पैदा की।