Join us

Video: हा नक्की बरा आहे ना? इरफानचा लेक बाबील एक महिन्यानंतर एअरपोर्टवर दिसला, चाहत्यांना काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:36 IST

त्या वादग्रस्त व्हिडीओनंतर इरफान खानचा लेक बाबील मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला. पण त्याची अवस्था पाहून सर्वांना धक्का बसला

अभिनेता इरफान खानचा (Irrfan Khan) मुलगा आणि अभिनेता बाबिल खान (Babil Khan) अलीकडे एका व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी एका व्हिडिओमुळे बाबीलविषयी चांगलाच वाद निर्माण झाला होता. अशातच बाबिलला नुकतंच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. या व्हिडिओमध्ये बाबिलचा लूक आणि त्याचा शांत स्वभाव पाहून अनेक चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. 

एअरपोर्टवर दिसला बाबिल खान

नुकतंच विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात डोक्यावर टोपी आणि डोळ्यांवर चष्मा घातलेला बाबील पाहायला मिळत आहे. बाबील जेव्हा एअरपोर्टवर दिसला, तेव्हा पापाराझींनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ घेतले. बाबिल खान यावेळी नेहमीप्रमाणे उत्साहात दिसला नाही. त्याचा शांत आणि गंभीर अंदाज पाहून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्यालाच दोष दिला असून काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

काही चाहत्यांनी बाबिलला प्रोत्साहन देत लिहिलं: "तू खूप चांगला ॲक्टर आहेस, तुझा आत्मविश्वास गमावू नको. आम्ही तुला हसताना पाहू इच्छितो.", ''हा आधीसारखा राहिला नाहीये. काहीतरी बिनसलंय'', तर काही युजर्सनी त्याला ट्रोल करत त्याच्या जुन्या व्हिडीओची आठवण करुन दिली. एका युजरने लिहिले, "सर्व काही व्यवस्थित सुरू होते, पण बाबीलने स्वतःच सगळ्यावर पाणी फेरले." अशाप्रकारे काही युजर्सनी काळजी व्यक्त केली तर काहींनी बाबीलला ट्रोल केलं

बाबिल खानचा जुना वाद

काही महिन्यांपूर्वी बाबिल खान एका वादग्रस्त व्हिडिओमुळे चर्चेत आला होता. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, जो नंतर डिलीट करण्यात आला. त्या व्हिडिओत बाबिलने अनन्या पांडे, अर्जुन कपूर आणि सिद्धांत चतुर्वेदीसह अनेक बॉलिवूड कलाकारांना फेक म्हटलंं होतं, असा दावा करण्यात आला होता. यानंतर बाबिलच्या आई आणि टीमने सांगितले होते की, बाबिल सध्या काही अडचणींमधून जात आहे. त्या प्रकरणानंतर महिनाभराने बाबील खान एअरपोर्टवर अशा अवस्थेत दिसल्याने सर्वांना आश्चर्य वाटलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Irrfan's son Babil Khan spotted at airport, fans express concern.

Web Summary : Irrfan Khan's son, Babil, was recently spotted at Mumbai airport, appearing subdued. This has sparked concern among fans, especially after a controversial video surfaced months ago where Babil allegedly called Bollywood celebrities 'fake'. Some trolled him, recalling the video; others expressed worry.
टॅग्स :इरफान खानबॉलिवूडविमानतळटेलिव्हिजनटिव्ही कलाकार