Join us
Daily Top 2Weekly Top 5

इलियाना डिक्रूझ झाली आई; बाळाचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 08:11 IST

Ileana dcruz: इलियानाने तिच्या बाळाचा पहिला फोटो आणि नाव जाहीर केलं आहे.

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ(ileana dcruz)  नुकतीच आई झाली आहे. इलियानाने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून त्याची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. इलियानाने १ ऑगस्ट तिच्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्याचा फोटो शेअर करत या बाळाचं नावहं जाहीर केलं आहे.

इलियानाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केली आहे. 'आमच्या लाडक्या मुलाचं या जगात स्वागत करताना आम्हाला किती आनंद होतोय हे शब्दांत सांगू शकत नाही. मन आनंदाने भरून आलंय, असं म्हणत इलियानाने या बाळाचा पहिला फोटो शेअर केला. सोबतच बाळाचं नाव कोआ फिनिक्स डोलन असं असल्याचंही तिने जाहीर केलं. इलियानाची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोबतच तिची पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे.

दरम्यान, इलियानाने १८ एप्रिल रोजी तिच्या प्रेग्नंसीविषयी सगळ्यांना जाहीरपणे सांगितलं होतं. तिने बेबीबंपसोबत तिचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहिल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. तसंच लग्नापूर्वी इलियाना आई होणार असल्यामुळे या बाळाचे वडील कोण हे जाणून घ्यायची नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर काही दिवसांपूर्वीच इलियानाने तिच्या प्रियकराचा फोटोही रिव्हिल केला. 

टॅग्स :इलियाना डीक्रूजबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा