बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अभिनेता अक्षय कुमार ही जोडी तब्बल १४ वर्षांनंतर 'भूत बंगला' या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असतानाच, प्रियदर्शन यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. जर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही, तर ते दिग्दर्शनाला रामराम ठोकतील, असं विधान त्यांनी केलंय.
काय म्हणाले प्रियदर्शन?
मिस मालिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "भूल भूलैय्यानंतर हॉरर कॉमेडी हा प्रकार एक ट्रेंड झाला आहे. त्यामुळे माझ्याकडे नवीन कल्पनांची कमतरता भासली. म्हणूनच कोणत्या गोष्टीवर सिनेमा बनवू हा मला प्रश्न पडला. त्यामुळे भूत बंगला सिनेमासाठी काम करताना यात मी काय नाविन्य आणू शकतो, असा मी विचार करत होतो. तेव्हा माझ्या डोक्यात फँटसी-कॉमेडी फिल्म बनवण्याचा विचार आला. यात माणसं जादूटोणा, भूताखेतांवर विश्वास ठेवतात. लोककथांची जोड देऊन आम्ही एक भूत बंगलाच्या माध्यमातून एक वेगळा प्रयत्न केलाय. ''मला आशा आहे की, लोक माझ्या या आयडियाचा स्वीकार करतील. जर भूत बंगला सिनेमा चांगला चालला तर मला थोडा आत्मविश्वास मिळेल. पण जर सिनेमा फ्लॉप झाला तर मात्र मी इंडस्ट्रीला रामराम ठोकेल. एक दिग्दर्शक लोकांच्या मनात कायम घर करत असतो. जर लोकांनीच त्याला नाकारलं तर स्वतःच निरोप घ्यावा. तोपर्यंत पुढे चालत राहा.'', असं प्रियदर्शन म्हणाले.
अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांनी यापूर्वी २०१० मध्ये 'खट्टा मीठा' या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर आता 'भूत बंगला' द्वारे ते पुन्हा एकदा 'हॉरर-कॉमेडी' हा जॉनर घेऊन येत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमारसोबतच इतरही अनेक दिग्गज कलाकार असणार असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट १० एप्रिलला रिलीज होणार आहे.
Web Summary : Director Priyadarshan threatens to quit if 'Bhoot Bangla' fails. Reuniting with Akshay Kumar after 14 years for this horror-comedy, he expressed concerns about originality and industry acceptance. The film releases April 10th.
Web Summary : निर्देशक प्रियदर्शन ने 'भूत बंगला' फ्लॉप होने पर संन्यास की धमकी दी। अक्षय कुमार के साथ 14 साल बाद हॉरर-कॉमेडी के लिए वापसी करते हुए, उन्होंने मौलिकता और दर्शकों की स्वीकृति पर चिंता व्यक्त की। फिल्म 10 अप्रैल को रिलीज।