Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्या रायमुळे अमिषाला मिळाला होता 'मंगल पांडे' सिनेमा; इतक्या वर्षानंतर 'गदर'च्या सकिनाने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 09:56 IST

Ameesha patel: अमिषाने दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला आमिर खानचा 'मंगल पांडे: द रायजिंग' हा सिनेमा नेमका कसा मिळाला ते सांगितलं.

'गदर' या सिनेमामुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल. सध्याच्या काळात अमिषा तिच्या अभिनयापेक्षा बोल्डनेसमुळे जास्त चर्चेत येते. अलिकडेच गदर २ या यशानंतर तिने काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. एका मुलाखतीमध्ये बोलत असतांना तिने अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चमुळे तिला मंगल पांडे हा सिनेमा मिळाल्याचं म्हटलं.

अमिषाने दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला आमिर खानचा 'मंगल पांडे: द रायजिंग' हा सिनेमा नेमका कसा मिळाला ते सांगितलं. सोबतच ऐश्वर्या या सिनेमातून आऊट झाल्यामुळे तिच्या पदरात हा सिनेमा पडल्याचंही तिने यावेळी सांगितलं.

''आमिर खान यांनी माझी बीबीसीला एक मुलाखत पाहिली होती. या मुलाखतीमध्ये माझ्या बोलण्याची पद्धत आणि माझ्यात असलेलं नॉलेज त्यांना आवडलं. त्यानंतर दिल्लीतील एका कार्यक्रमात आमच्या दोघांची भेट झाली. या भेटीमध्ये आम्ही बराच वेळ एकमेकांशी चर्चा केली. याच चर्चेदरम्यान आमिरला वाटलं की, त्यांच्या पुढील सिनेमाची अभिनेत्री मी असावं'', असं अमिषाने सांगितलं.

पुढे ती म्हणते, ''लगान सिनेमासाठीदेखील माझं नाव फायनल झालं होतं. माझी स्क्रीन टेस्ट सुद्धा झाली होती. मी माझ्या तारखाही या सिनेमासाठी दिल्या होत्या. पण, नशीबाला काही तरी वेगळंच मान्य होतं. मी न्यूझीलंडमध्ये कहो ना..प्या हैं या सिनेमाचं चित्रीकरण कर होते त्यावेळी आशुतोष गोवारीकर यांचा मला फोन आला. आणि, 'मी एका गावातल्या मुलीसारखी दिसत नाही', असं ते म्हणाले आणि हा सिनेमा माझ्या हातून गेला.''

ऐश्वर्यामुळे अमिषाला मिळाला मंगल पांडे

मंगल पांडे या सिनेमात अमिषाने ज्वाला ही भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रथम ऐश्वर्या राय-बच्चन साकारणार होती. परंतु, काही कारणास्तव ऐश्वर्याने हा सिनेमा रिजेक्ट केला. ऐश्वर्याने सिनेमा सोडल्यानंतर ही भूमिका अमिषाच्या पदरात पडली, असं अमिषाने यावेळी सांगितलं. विशेष म्हणजे अमिषाच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Aishwarya Rai led to Amisha Patel getting 'Mangal Pandey' film.

Web Summary : Amisha Patel reveals Aishwarya Rai's exit helped her secure 'Mangal Pandey'. Aamir Khan saw her interview and felt she was suitable for the role. She was earlier considered for 'Lagaan' but was rejected.
टॅग्स :बॉलिवूडअमिषा पटेलऐश्वर्या राय बच्चनआमिर खानसिनेमा