Join us

कंगना राणौत स्वतः क्षत्रिय असल्याचं सांगत म्हणाली - 'सर कटा सकती हूं, लेकिन सर झुका सकती नहीं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 14:43 IST

कंगना राणौतने नुकतेच तिच्या तत्वांसोबत कोणतीच तडजोड करणार नसल्याचे सांगितले आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत गेल्या काही दिवसांपासून आपल्या विधानांमुळे चर्चेत येते आहे. पुन्हा एकदा कंगनाने ट्विटरवर आपले मत व्यक्त केले आहे. कंगना म्हणाली की, मी माझं मुंडकं उडवून घेईन, पण डोके खाली झुकवणार नाही. तसेच तिने तिच्या तत्वांसोबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे म्हटले आहे.

कंगना राणौतने नुकतेच ट्विट करत म्हटलंय की, मी क्षत्रिय आहे. डोके कापून घेऊ शकते पण झुकवू शकत नाही. राष्ट्राच्या सन्मानासाठी नेहमीच आवाज बुलंद ठेवेन. मान, सन्मान, स्वाभिमानासोबत जगले आहे आणि गर्वाने राष्ट्रवादी बनून जिंकत राहीन. तत्वांसोबत कधीच तडजोड केली नाही आणि कधी करणारही नाही. जय हिंद.खरेतर जया बच्चन यांच्यावर पलटवार केल्यानंतर कंगना राणौतवर खूप टीका होत आहे. त्यानंतर कंगनाने ही प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होते आहे.

काय म्हणाल्या होत्या जया बच्चनरवी किशन यांच्या विधानानंतर जया बच्चन म्हणाल्या होत्या की, ' आमच्या एका खासदाराने लोकसभेत बॉलिवूडच्या विरोधात वक्तव्य केले. हे लाजीरवाणे आहे. मी कोणाचे नाव घेत नाही. तो स्वत: इंडस्ट्री मधून आला आहे. ज्या ताटात जेवायचं त्यालाच छिद्र पाडायचं ही एक चुकीची गोष्ट आहे. इंडस्ट्रीला सरकारच्या संरक्षण आणि पाठिंब्याची आवश्यकता आहे. बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे असा आरोप त्यांनी केला होता

जया बच्चन- कंगना वादात अमिताभ बच्चन यांची एन्ट्री, ट्रोलर्सला लगावला जोरदार टोला

कंगनाचा जया यांच्यावर पलटवारकंगनाने जया बच्चन यांच्या वक्तव्यावर पलटवार केला. ती ट्विट करत म्हणाली की, जया बच्चन आणि त्यांच्या इंडस्ट्रीने मला कुठले ताट दिले आहे. एक ताट मिळाले होते ज्यामध्ये दोन मिनिटांचा आयटम्स नंबर्स आमि एका रोमँटिक सीनचा रोल मिळायचा तोसुद्धा हिरोसोबत शय्यासोबत केल्यानंतर. त्यानंतर मी या इंडस्ट्रीला फेमिनिझम शिकवला. तसेच हे ताट देशभक्ती आणि स्त्रीप्राधान्य असलेल्या भूमिकांना सजवले. जयाजी हे माझे स्वत:चे ताट आहे, असा टोला कंगनाने लगावला.

स्वराचं कंगनाला उत्तर'तनु वेड्स मनु'मध्ये कंगनासोबत काम करणारी अभिनेत्री स्वरा भास्करने कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

ती म्हणाली की, 'तुझ्या डोक्यातील घाण तुझ्यापर्यंतच ठेव. जर तुला मला शिव्या द्यायच्या तर दे. मी आनंदाने तुझ्या ऐकून घेईन. तुझ्यासोबत चिखलात कुस्तीही खेळेन. मोठ्यांचा आदर करणं भारतीय संस्कृतीत शिकवलं जातं. तू एक स्वंयघोषित राष्ट्रवादी आहे'.

 

टॅग्स :कंगना राणौतजया बच्चनस्वरा भास्कर