Join us

अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 10:47 IST

Who is Huma Qureshi's Boyfriend: हुमानं एका खाजगी समारंभात बॉयफ्रेंडसोबत गुपचूप साखरपुडा उरकल्याची बातमी समोर येत आहे.

Huma Qureshi Engagement: 'गॅग ऑफ वासेपूर', 'महारानी', 'मोनिका: ओ माय डार्लिंग' यांसारखे अनेक गाजलेले सिनेमे देणारी अभिनेत्री म्हणजे हुमा कुरेशी (Huma Qureshi). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर हुमाने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. हुमा ही आपल्या बेधडक आणि स्पष्ट व्यक्तिमत्वामुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, तिनं कायम आपल्या लव्ह लाइफबाबत गुप्तता बाळगली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अशातच हुमानं एका खाजगी समारंभात बॉयफ्रेंडसोबत गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, हुमानं तिचा बॉयफ्रेंड रचित सिंह याच्यासोबत गुपचूप साखरपुडा उरकलाय. गायिका अकासा सिंगने हुमा कुरेशी आणि रचित सिंह यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केल्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे.  अकासाने इन्स्टाग्राम स्टोरीवर हुमा आणि रचितबरोबरच्या फोटोवर कॅप्शनमध्ये लिहलं, "रचित व हुमा तुम्ही तुमच्या Piece of Heaven ला एक नाव दिल्याबद्दल अभिनंदन. ही रात्र खूप छान होती". हुमा ही रचितच्या खासगी वाढदिवस पार्टीचाही भाग होती. या दोघांना आधी सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात एकत्र पाहिले गेले होते. मात्र, साखरपुड्याबद्दल अभिनेत्रीकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही.

हुमा कुरेशीचा होणारा नवरा रचित सिंह काय करतो ?

रचित सिंह हा व्यवसायाने एक प्रसिद्ध अभिनय कोच आहेत. त्यानं आलिया भट, रणवीर सिंग, वरुण धवन, विक्की कौशल, अनुष्का शर्मा आणि सैफ अली खान यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांना प्रशिक्षण दिले आहे. अभिनयासोबतच रचितने 'कर्मा कॉलिंग' या मालिकेत वेदांतची भूमिकाही साकारली आहे.

हुमा कुरेशी यापूर्वी दिग्दर्शक मुदस्सर अजीजला डेट करत होती, ज्यांच्यासोबत तिचे ऑक्टोबर २०२२ मध्ये ब्रेकअप झाले होते. आता रचित सिंहसोबतच्या तिच्या नव्या नात्याची आणि साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याबद्दल दोघांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी, बी-टाउनमध्ये या बातमीने उत्सुकता निर्माण केली आहे. हुमा कुरेशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती सुभाष कपूर दिग्दर्शित 'जॉली एलएलबी ३' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अरशद वारसी, अमृता राव आणि सौरभ शुक्ला यांच्याही प्रमुख भूमिका आहे.

टॅग्स :हुमा कुरेशीबॉलिवूडरिलेशनशिप