Join us
Daily Top 2Weekly Top 5

यालाच म्हणतात प्रेम! जुहू येथील महागडा फ्लॅट हृतिकने गर्लफ्रेंडलाच दिला भाड्याने, घेणार फक्त 'इतके' रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:57 IST

हृतिकने त्याच्या गर्लफ्रेंडला भाड्याने फ्लॅट दिला आहे. आता दर महिना हृतिक तिच्याकडून एक ठराविक रक्कम वसूल करणार आहे.

अभिनेता हृतिक रोशन हा सध्या त्याच्या 'वॉर २' सिनेमामुळे चर्चेत आहे. हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझाद सुद्धा लवकरच बॉलिवूडमध्ये 'साँग ऑफ पॅराडाईज' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच हृतिक आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. ते म्हणजे हृतिकने त्याचा महागडा आणि आलिशान फ्लॅट त्याच्या गर्लफ्रेंडलाच भाड्याने दिला आहे. आता हृतिक दरमहिना त्याच्या गर्लफ्रेंडकडून मोठी रक्कम वसूल करणार आहे. जाणून घ्या

हृतिकने सबाला भाड्याने दिला फ्लॅट

हृतिक रोशनने मुंबईतील जुहू-वर्सोवा येथील मन्नत अपार्टमेंट्समध्ये असलेला एक सी-फेसिंग लक्झरी अपार्टमेंट सबा आझादला भाड्याने दिला आहे. हा फ्लॅट सुमारे १,००० ते १,३०० चौरस फूट आहे. सध्या या भागातील अशा फ्लॅटचे भाडे १ लाख ते ३ लाख रुपयांपर्यंत आहे, पण हृतिकने सबाला फक्त ७५ हजार रुपये प्रति महिन्याच्या भाड्यावर हा फ्लॅट दिला आहे. सध्या हृतिक त्याच्या परिवारासोबत याच अपार्टमेंटमध्ये राहत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सबा आझादने या फ्लॅटच्या भाड्याच्या करारावर ४ ऑगस्ट रोजी स्वाक्षरी केली आहे. तिने १.२५ लाख रुपये डिपॉझिट म्हणून दिले आहेत. अशाप्रकारे हृतिक आता त्याच्या गर्लफ्रेंडकडूनच  भाड्याचे पैसे वसूल करणार आहे. हृतिक आणि सबा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि अनेकदा ते सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसतात. त्यांच्या नात्याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. हृतिकने सबाला कमी भाड्यात फ्लॅट दिल्याने, सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची आणखी चर्चा सुरू झाली आहे. दोघेही सध्या त्यांच्या फिल्मी करिअरवर लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत.

टॅग्स :हृतिक रोशनसुंदर गृहनियोजनबॉलिवूड