बॉलिवूडमधील परमसुंदरी आणि हॉट आणि बोल्ड भूमिकांमुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत. वयाच्या ४९ व्या वर्षीही मल्लिका (mallika sherawat) फिट अँड फाईन आहे. मल्लिकाने पहिल्यांदाच सोशल मीडियावर तिच्या फिटनेस मंत्राचा खुलासा केला आहे. मल्लिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तिने सकाळी उठल्यावर ती कोणतं ड्रिंक घेते यामुळे दिवसभरात तिच्यामध्ये एनर्जी राहते, याचा खुलासा केलाय. काय म्हणाली मल्लिका? जाणून घ्या.
मल्लिकाचा फिटनेस मंत्र
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करुन मल्लिका म्हणाली की, " सर्वांना सुप्रभात. मी तुम्हा सर्वांसोबत एक हेल्थ टीप शेअर करणार आहे. मी सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पिते. आरोग्यासाठी हे पाणी चांगलं असतं. दिवसाची सुरुवात जर तुम्ही या पाण्याने केली तर तुमची पचनक्रिया चांगली होते. याशिवाय शरीरामध्ये पाण्याची पातळी पुरेशी राहून तुम्हाला नैसर्गिक एनर्जी मिळते." अशाप्रकारे मल्लिका शेरावतने सर्वांना फिट राहण्याचा सोपा उपाय सांगितला आहे.
मल्लिका शेरावतचं वर्कफ्रंट
मल्लिका शेरावतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तिला आपण 'मर्डर', 'ख्वाहिशें', 'डर्टी पॉलिटिक्स', प्यार के साइड इफेक्ट्स', 'गुरु', 'वेलकम', ', 'बचकर रहना रे बाबा', 'डबल धमाल' अशा सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. 'मर्डर'मध्ये मल्लिका आणि इमरान हाश्मीच्या बोल्ड केमिस्ट्रीची आजही चर्चा होते. २०२५ मध्ये मल्लिका आपल्याला 'विक्की विद्या का वो वाला व्हिडीयो' सिनेमात कॉमेडी भूमिका साकारताना दिसली.