Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' व्यक्तीमुळे शक्ती कपूर झाला सुपरस्टार; नाव ऐकून तुम्हीदेखील व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 12:41 IST

Shakti kapoor : खलनायिकी भूमिका साकारत अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. यातलाच एक अभिनेता म्हणजे शक्ती कपूर ( shakti kapoor).

ठळक मुद्देफिरोज खान यांच्या 'कुर्बानी'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारुन शक्ती कपूर प्रकाशझोतात आला.

बॉलिवूडमध्ये असे असंख्य कलाकार आहेत ज्यांच्या नकारात्मक भूमिकाही पडद्यावर तुफान गाजल्या. खलनायिकी भूमिका साकारत अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. यातलाच एक अभिनेता म्हणजे शक्ती कपूर ( shakti kapoor). असंख्य चित्रपटांमध्ये व्हिलनची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. परंतु, प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याची कलाविश्वात नेमकी एण्ट्री कशी झाली माहितीये का? शक्ती कपूरचा पहिला चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. परंतु, त्याला हा पहिला ब्रेक नेमका कसा मिळाला ते आज जाणून घेऊयात.

अभिनेता शक्ती कपूरची मुख्य भूमिका असलेला 'कुर्बानी' हा चित्रपट साऱ्यांनाच ठावूक असेल. या चित्रपटातील शक्ती कपूरची भूमिका त्याकाळी तुफान गाजली होती. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. विशेष म्हणजे लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या या कलाकाराला अभिनेता फिरोज खान याच्यामुळे ब्रेक मिळाला होता.

Exclusive : '...म्हणून मी तसा टॅटू काढला'; फोटोवरून ट्रोल झालेल्या भाग्यश्रीचं प्रत्युत्तर

फिरोज खानने दिला ब्रेक

काही दिवसांपूर्वीच शक्ती कपूर 'द कपिल शर्मा' शो या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी चर्चा केली. यात फिरोज खानमुळेच आज कलाविश्वात आहे असं त्यांनी सांगितलं.

"एकदा मी लिंकिंग रोडवरुन साऊथ बॉम्बेला जात होतो. त्यावेळी माझ्या गाडीची धडक एका मर्सिडीज कारला बसली. त्यामुळे मी पटकन माझ्या गाडीतून उतरलो आणि समोर पाहतो तर ६ फूट २ इंच उंची असलेला एक रुबाबदार व्यक्ती त्याच्या गाडीतून बाहेर आला. तो व्यक्ती म्हणजे फिरोज खान होते. त्यांना पाहिल्यावर मी लगेचच माझी ओळख करुन दिली. सर माझं नाव शक्ती कपूर आहे. पुण्यातील फिल्म इंस्टिट्यूटमधून मी अॅक्टिंगचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्लीज मला चित्रपटात काम करण्याची संधी द्या असं मी त्यांना म्हणालो", असं शक्ती कपूरने सांगितलं.

पुढे ते म्हणतात, "त्याच दिवशी मी संध्याकाळी माझ्या के. के. शुक्ला या जवळच्या मित्राकडे गेलो. त्यावेळी तो फिरोज खान यांच्या कुर्बानीसाठी लिखाण करत होता. त्याचवेळी तो म्हणाला की, फिरोज खान पुणे फिल्म इंस्टिट्यूटमधील एका मुलाचा शोध घेत आहेत. ज्याच्या गाडीला यांची कार धडकली होती. त्यावेळी मीच तो व्यक्ती असल्याचं त्यांना सांगितलं. त्यानंतर या मित्राने फिरोज खानला फोन करुन माझ्याविषयी सांगितलं आणि मला कुर्बानीमध्ये रोल मिळाला".

शेहशाह: 'त्या' सीनमध्ये सिद्धार्थने जाणूनबुजून केलं कियाराला किस; सत्य आलं समोर

दरम्यान, फिरोज खान यांच्या 'कुर्बानी'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारुन शक्ती कपूर प्रकाशझोतात आला. या चित्रपटानंतर त्याने आयुष्यात कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यामुळेच आज शक्ती कपूर बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. 

टॅग्स :शक्ती कपूर